देवदत्त पडिक्क्ल आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

RCB vs RR IPL 2021 Match 16: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या 16व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरोधात 10 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. आरसीबीच्या विजयात शतकवीर देवदत्त पडिक्क्ल आणि कर्णधार विराट कोहलीने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला आणि यंदाच्या इंडियन्स प्रीमियर लीगच्या आपली घोडदौड सुरूच ठेवली. आरसीबीने आजवर खेळलेल्या चार सामन्यातील चौथा विजय ठरला. पडिक्क्लने 101 धावा तर विराट 72 धावा करून नाबाद परतला. राजस्थानने पहिले फलंदाजी करून दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बेंगलोरने 16.3 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता संजू सॅमसनच्या संघाला धोबीपछाड दिला. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आज फलंदाजीनंतर चेंडूने देखील निरुत्तर दिसले. एकही गोलंदाज विकेट काढण्यात अपयशी ठरला. (RCB vs RR IPL 2021: Virat Kohli ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा RCB कर्णधार ठरला पहिलाच फलंदाज!)

सध्याच्या मोसमात बेंगलोर संघ शानदार फॉर्मात आहेत. पहिल्या तीनही सामन्यात आता विजयाचा चौकार लागवलेल्या आरसीबीचा विश्वास दुणावललेला असेल. पहिल्या तीन सामन्यात विजयानंतर आरसीबी राजस्थान विरोधात मैदानावर उतरली होती आणि आपल्या अष्टपैलू खेळीमुळे विराटसेना राजस्थान वरचढ ठरली. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात युवा सलामी फलंदाज पडिक्क्लने चौकार खेचतधमाकेदार शतक पूर्ण केलं. देवदत्तने 51 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक साजरं केलं. यापूर्वीच्या दोन सामन्यात तो झटपट बाद झाला होता. पडिक्क्लने आपल्या नाबाद खेळीत 52 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. याशिवाय कर्णधार विराटने 47 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा करत पडिक्क्लला योग्य साथ दिली.

यापूर्वी, राजस्थानचे सुरुवातीला चार गडी झटपट बाद झाल्यानंतर 5व्या विकेटसाठी शिवम दुबे आणि रियान परागच्या जोडीने राजस्थानचा डाव सावरला. मात्र चुकीचा फटका मारण्याच्या नादात रियान चहलच्या हाती झेल देऊन बाद झाला. परागपाठोपाठ दुबे देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तंबूत परतला. शिवमने 46 धावांची खेळी केली, तर पराग 25 धावा करुन बाद झाला. त्यानंतर राहुल तेवतियाने चांगली खेली केली. दुसरीकडे, आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले, तर हर्षल पटेल महागडा ठरला. त्याने चार ओव्हरमध्ये 47 धावा दिल्या 3 विकेट काढल्या.