दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Twitter/IPL)

RR vs DC, IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राचा 23वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात शारजाह येथे खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 184 धावा केल्या आणि रॉयल्सला 185 धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल्स 138 धावांवर ऑलआऊट झाले आणि दिल्लीने 46 धावांनी धुव्वा उडवला. रॉयल्सने यंदाही फलंदाजीने निराश केले आणि चौथा पराभव पत्करावा लागला. या विजयासह दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच राहिली. कॅपिटल्सने दिलेल्या 185 धावांराजस्थानकडून आघाडीचे तीन फलंदाज वगळता अन्य कोणीलाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 34, स्टिव्ह स्मिथने 24 आणि जोस बटलरने 13 धावा केल्या. राहुल तेवतिया अखेरपर्यंत झुंज देत राहिला पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. तेवतिया 38धावा करून बाद झाला.  दुसरीकडे, दिल्लीसाठी कगिसो रबाडाने 3, आर अश्विन आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी 2 तर एनरिच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. (RR vs DC, IPL 2020: शिखर धवन पुन्हा अपयशी, RR विरुद्ध अजिंक्य रहाणेला संधी न दिल्याने संतप्त नेटकऱ्यांनी दिल्ली व्यवस्थापनावर व्यक्त केली नाराजी)

राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नाही आणि दिल्लीचा फिरकी गोलंदाज अश्विनने 13च्या धावसंख्येवर बटलरला स्वस्तात माघारी पाठवले. कर्णधार स्मिथ 24 धावांवर नॉर्टजेचा शिकार बनला. शिमरॉन हेटमायरने स्मिथचा बाउंड्री लाईनवर झेल पकडला. संजू सॅमसनचा खराब फॉर्म आजच्या सामन्यात देखील सुरूच राहिला आणि 5 धावा करून तो माघारी परतला. महिपाल लोमरोरने देखील एक धाव करून अश्विनसमोर सरेंडर केले. यशस्वा जयस्वालने 34 धावांची चांगली खेळी साकारली, पण स्टोइनिसने त्याला क्लीन बोल्ड केलं. अँड्र्यू टाय देखील 6 धावांवर अक्षर पटेलच्या चेंडूवर रबाडाकडे झेलबाद झाला. आजच्या सामन्यात हेटमायरने एकूण 3 कॅच पकडले.

यापूर्वी, यंदाच्या आयपीएल मोसमात दिल्ली फलंदाजांची पहिल्यांदाच पडझड पाहायला मिळाली आणि रॉयल्सविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 185 पर्यंत मजल मारली. हेटमायरने 45 आणि स्टोइनिसच्या 39 धावांमुळे दिल्लीला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारता अली.