भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रुद्र प्रताप सिंह (R.P. Singh) ट्वीटरच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आर. पी सिंह आणि देवांशी पोपट यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. स्वत: आर. पी. सिंह याने सोशल मीडियाच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. ज्यामुळे आर.पी. सिंह आणि देवांशी यांच्या कुटुंबात आणखी एका जणाचे आगमन झाले आहे. तब्बल तीन वर्ष एकमेकांना डेटिंग केल्यानंतर आर.पी सिंह आणि देवांशी यांचे 1 डिसेंबर 2012 साली लग्न झाले होते. त्यानंतर 2017 दोघेही पहिल्यांदा आई-बाबा बनले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाच आरपी सिंह नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने आपल्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याचे सांगितले आहे. देवाच्या कृपाने मला आणि देवांशीला आमच्या मुलाच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे. ॐ नमः शिवाय, हर हर महादेव.', अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे. त्यानंतर आरपी सिंह यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. हे देखील वाचा- 'रासोडे में कौन था' रॅपवर युजवेंद्र चहल आणि मंगेतर धनश्री वर्माची मस्ती, तर क्रिस गेलं म्हणाला 'आता पुरे! मी रिपोर्ट करेन' (Watch Video)
आर.पी. सिंह याचे ट्विट-
With the grace of God, @DevanshiS_ and I are delighted to announce the birth of our baby boy. #ॐ_नमः_शिवाय #HarHarMahadev
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) September 3, 2020
आरपी सिंहने आपल्या कारकिर्दीत 14 कसोटी, 58 एकदिवसीय, 10 टी-20 आणि 82 आयपीएलचे सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 42.0 च्या सरासरीने 40, एकदिवसीय सामन्यात 34.0 च्या सरासरीने 69 आणि टी-20 सामन्यात 15.0 सरासरीने 15 बळी घेतले आहे. तर, आयपीएल सामन्यात 26.0 च्या सरासरीने 90 बळी घेतले आहेत.