Dale Steyn (Photo Credit: Twitter)

आयपीएलचा (IPL 2021) पुढील हंगाम सुरु होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाला (Royal Challengers Bangalore) मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने आयपीएलच्या पुढील हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. डेल स्टेनने घेतलेला हा निर्णय आरसीबीच्या संघासाठी मोठा धक्का मानले जात आहे. स्टेन हा आरसीबीचा अनुभवी गोलंदाज असल्यामुळे पुढील हंगामात त्याची कमतरता कोणता खेळाडू भरून काढेल? हे आयपीएलच्या चौदाव्या हंगामात नक्कीच कळेल.

स्टेनने नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने असे म्हटले आहे की, मी सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो. मी आयपीएलच्या पुढील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी उपलब्ध नसेल. मी या कालावधीत दुसऱ्या स्पर्धेत खेळण्याचा विचार करत आहे. तसेच बंगळुरु टीम मॅनेजमेंटने मला समजून घेतले आणि सहकार्य केले. त्यासाठी मी आभारी आहे, अशा आशयाचे त्याने ट्विट केले आहे.  महत्वाचे म्हणजे, तो आयपीएलमधून निवृत्ती घेत नसल्याचेही त्याने सांगितले आहे. स्टनेच्या ट्विटला आरसीबीने भावनिक उत्तर दिले आहे. संघात तुझी उणीव भासेल, असे आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून म्हंटले गेले आहे. हे देखील वाचा- AUS Vs IND: भारतीय खेळाडूंकडून बायो सिक्युरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन; रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी यांच्यासह 'हे' पाच खेळाडू विलगीकरण कक्षात

ट्विट-

 

आयपीएलच्या गेल्या हंगामात डेल स्टेनला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, त्याला नेहमीच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जाते. डेल स्टेनने आयपीएलमध्ये एकूण 95 सामने खेळले आहेत. यात त्याने 25.85 च्या सरासरीने आणि 6.91 या इकॉनॉमी रेटने एकूण 97 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, 8 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.