
Royal Challengers Bengaluru Women vs Mumbai Indians Women: महिला प्रीमियर लीगचा सातवा सामना आज म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यात बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा तिसरा सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, आज ते मुंबई इंडियन्सविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करेल. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सनेही आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि दुसऱ्या सामन्यात विजय मिळाला. मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरकडे असेल.
किती वाजता सुरु होणार सामना?
महिला प्रीमियर लीग 2025 चा सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यात शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि मुंबई इंडियन्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा सातवा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर, नदीन डी क्लार्क, सजीवन सजना, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता, एसिका इशाक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल वायट-हॉज, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.