Rohit Sharma ने शेअर केला लेक समायरा सोबत मस्ती करतानाचा सुपरक्युट व्हिडिओ
Rohit Sharma (Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट संघात 'हिटमॅन' अशी ओळख असणारा फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्या मुलीचा बाबा झाला आहे. न्युझीलंड दौर्‍यामध्ये दमदार कामगिरी कारणार्‍या रोहित शर्माने ट्विटरच्या माध्यमातून मुलगी समायरासोबतचा (Samaira) एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाप-लेक खेळत आहेत. समायराचा हा पहिला व्हिडिओ खूपच सुपरक्युट आहे. Rohit Sharma ने मुलीच्या नव्या फोटोसोबतच नावाचाही केला उलगडा, भावनिक पोस्ट शेअर करत मोकळ्या केल्या भावना

रोहित शर्मा 13 डिसेंबर 2015 मध्ये रितिका सजदेवसोबत विवाहबद्ध झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांच्या घरी गोंडस मुलीच्या रुपात आनंद आला आहे. मुलगी झाल्यानंतर रोहित शर्मा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना सोडून भारतामध्ये परतला. यादरम्यान त्याने काही दिवस समायरासोबत घालवल्यानंतर तो पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी परतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती.

रोहित शर्माने न्युझिलंड दौर्‍यात T20 इंटरनॅशनल सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर केल्या आहेत.