Rohit Sharma ने मुलीच्या नव्या फोटोसोबतच नावाचाही केला उलगडा, भावनिक पोस्ट शेअर करत मोकळ्या केल्या भावना
Rohit Sharma (Photo Credits: Twitter)

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रितिका (Ritika Sajdeh) यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या चिमुकलीची पहिली झलक सोशल मीडियातून शेअर केली होती. आता रोहितने नव्या फोटोसह तिचं नावही जाहीर केलं आहे. रोहित आणि रितिकाने त्याच्या मुलीचं नाव समायरा शर्मा (Samaira)  असं ठेवलं आहे. रितिका आणि मुलीसोबतचा फोटो शेअर करताना त्याने खास पोस्ट देखील लिहली आहे. Rohit Sharma च्या मुलीची पहिली झलक (Photo)

रोहित शर्मा 13 डिसेंबर 2015 मध्ये रितिका सजदेवसोबत विवाहबद्ध झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांच्या घरी गोंडस मुलीच्या रुपात आनंद आला आहे. मुलगी झाल्यानंतर रोहित शर्मा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना सोडून भारतामध्ये परतला. सध्या तो मुंबईमध्येच कुटुंबासोबत आहे मात्र 12 जानेवारीपासून सिडनीत सुरु होणाऱ्या वन इंटरनॅशनल सिरीजमध्ये (ODI) खेळण्यासाठी रोहित पुन्हा 8 जानेवारीला सिडनीला रवाना होणार आहे.