भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यांना अपत्यप्राप्ती झाली आहे. शुक्रवारी रात्री स्थानिक रुग्णालयात बाळंतपणासह या आनंदाच्या बातमीची पुष्टी झाली. या जोडप्याला आधीच समायरा नावाची एक मुलगी आहे, जी 30 डिसेंबर रोजी सहा वर्षांची होणार आहे. आता या दाम्पत्याने एका पुरुष जातीच्या अर्भकास जन्म दिला आहे. क्रिकेटपटूने सोशल मीडिया मंच वापरत आपल्या इंन्टाग्राम पेजवरुन स्वत:स झालेल्या आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.
चाहत्यांनी साजरी केली आनंदाची बातमी
रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याची बातमी मिळताच चाहत्यांच्या आणि क्रिकेटप्रेमींच्या अभिनंदन संदेशांनी त्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भरून गेले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जवळ येत असताना, क्रिकेट चाहते रोहित शर्माची उपलब्धता आणि मालिकेच्या सलामीच्या सामन्यासाठी संघाच्या अंतिम लाइनअपच्या पुढील अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. (हेही वाचा, Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला पिता? कर्णधाराच्या घरी जूनियर 'हिटमॅन'चे आगमन झाल्याची सोशल मीडियावर चर्चा)
पालकत्वाच्या जबाबदारीसाठी दौऱ्यातून माघार?
रोहित शर्मा आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-gavaskar Trophy) मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेत घरी परतला. भारतात परतल्यानंतर तो आपली जोडीदारीण रितिका सजदेह हिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. ज्यामुळे तिच्यासाठी अतिशय कठीण असलेला काळ काहीसा सोपा झाला. दरम्यान, त्याच्या अनुपस्थितीमुळे 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याच्या सहभागाबद्दल अटकळ बांधली जात आहे. (हेही वाचा, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षादरम्यान रोहित शर्माची पत्नी Ritika Sajdeh ने शेअर केली 'All Eyes on Rafah' मोहिमेला पाठींबा दर्शवणारी इंस्टाग्राम स्टोरी; 'खाते हॅक झाले का?' चाहत्यांचा प्रश्न)
रोहीतची कसोटी!, गौतम गंभीर यांची स्पष्टोक्ती
सध्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय संघाला रोहितच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची कमतरता भेडसावत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रस्थानपूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, "सध्या कोणतीही पुष्टी नाही. तो उपलब्ध असेल अशी आशा आहे. आम्ही याबाबत आपणांस लवकरच कळवू ".
रोहित पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही तर उपकर्णधार जसप्रित बुमराह कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल अशी शक्यता आहे. फलंदाजी क्रमवारीत संभाव्य बदलांचा उल्लेख करताना गंभीर म्हणाला, "जर रोहित उपलब्ध नसेल तर आमच्याकडे (अभिमन्यू) ईश्वरन आणि के. एल. (राहुल) ऑस्ट्रेलियात आहेत".
रोहितने दिली आनंदाची बातमी
View this post on Instagram
रोहितची उपस्थिती संघासाठी महत्त्वाची
भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजीने अलीकडच्या सामन्यांमध्ये कमकुवतपणा दाखवला आहे, ज्यामुळे रोहितचा अनुभव आणि नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. रोहित सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी, मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याची धोरणात्मक भूमिका महत्त्वपूर्ण आहे, विशेषतः ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघाविरुद्ध.