Rohit Sharma Blessed With Baby Boy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दुसऱ्यांदा रोहित शर्माच्या घरात हशा पिकला आहे. भारतीय कर्णधार पुन्हा एकदा बाप झाला आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने शुक्रवारी एका मुलाला जन्म दिला. याची चर्चा जोरदार सोशल मीडियावर रंगली आहे. हिटमॅन आणि रितिका दुसऱ्यांदा आई-वडील झाल्याची बातमी आल्यानंतर त्यांना सतत अभिनंदनाचे मेसेज येऊ लागले आहेत. मात्र, रोहित शर्माच्या बाजूने अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या मुलाच्या जन्मापूर्वी रोहित आणि रितिका यांना एक मुलगी आहे. जिचे नाव समायरा आहे. रोहित आणि रितिका यांनी 2015 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये रोहित आणि रितिका पहिल्यांदाच आई-वडील झाले आणि समायराचा जन्म झाला. आता लग्नासाठी 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोघेही दुसऱ्यांदा आई-वडील झाले असून रितिकाने एका मुलाला जन्म दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)