विराट कोहली फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन; रोहित शर्मा कडे जाणार वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची धुरा?
Rohit Sharma And Virat Kohli (Photo Credits: FIle Image)

आयसीसी विश्वचषक (ICC World Cup) स्पर्धेचं पर्व नुकतंच यजमान इंग्लंडच्या (England) विजयाने पूर्ण झालं, या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या (Team India)  शिलेदारांनी लक्षवेधी कामगिरी केली. त्यांनंतरही ऐन उपांत्य फेरीत आपला न्युझीलँडच्या (New Zealand) संघाकडून पराभव झाला. मात्र यामुळे निराश न होता टीम इंडियाला पुढील आवाहनासाठी तयारी करण्याची गरज आहे असे म्हणत BCCIने संघाच्या पुढील बांधणीसाठी चर्चा सुरु केल्या आहेत. यानुसार येत्या काळात टीममध्ये मोठे बदल केले जाणार असल्याचे संकेत आहेत. BCCI च्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे वन डे आणि टी-20 सामन्यांच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली जाऊ शकते तर टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) च भारताचा कर्णधार असेल. NZ vs ENG World Cup 2019 Final मॅचमध्ये जो रुट आणि केन विलियमसन फेल, रोहित शर्माने सर्वाधिक धावा करत जिंकली 'गोल्डन बॅट'

बीसीसीआयच्या या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, रोहितला 50 ओव्हरच्या सामन्यासाठी कर्णधारपद देण्याची हीच योग्य वेळ आहे. सध्याच्या कर्णधाराला तसेच व्यवस्थापनाला टीममधील खेळाडूंचे चांगले सहकार्य लाभले आहे , त्यामुळे आतापासूनच पुढच्या विश्वचषकासाठी तयारी सुरु केली जाईल. त्यानुसार टीम मध्ये काही बदल करण्याची गरज आहे, आणि रोहित हा त्यासाठी सर्वात उचित खेळाडू आहे.. (ICC World Cup 2019: 'एम एस धोनी शिवाय टीम इंडिया जिंकूच शकत नाही', ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू स्टीव्ह वॉ याने केली 'कॅप्टन कूल' च्या समर्थानात बॅटिंग)

टीम इंडियाचा विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभव पाहता साहजिकच क्रिकेट प्रेमींमध्ये विविध माध्यमांवर चर्चा रंगल्या होत्या. यामध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या खेळावर अनेकांनी प्रश्न केले. काहींच्या मते, संपूर्ण टीम ही केवळ कर्णधार कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या आधारे खेळत होती ज्यामुळे त्यांच्या अपयशानंतर संघाच्या पदरी निराशा आली असेही बोलले जात होते.

दरम्यान पुढील महिन्यात, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे, यामध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे तर यावेळी रोहित शर्माकडे कर्णधार पद सोपवले जाऊ शकते.