गतउपविजेत्या न्यूझीलंड (New Zealand) संघाने आज आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमधील अंतिम फेरीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 1992 नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या यजमान इंग्लंड (England) च्या गोलंदाजांनी प्रभावी खेळ करत किवींच्या धावगतीला लगाम लावला. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) आणि इंग्लंडचा जो रूट (Joe Root) यांना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याला सर्वाधिक धावांच्या यादीत मागे टाकण्याची संधी होती पण विश्वचषकच्या अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरीमुळे क्रिकेट जगतमधील हे दोघे रोहितला मागे टाकू शकले. त्यामुळे रोहितने यंदाच्या सर्वाधिक धावा करत विश्वचषकचे 'गोल्डन बॅट' मिळवले आहे. (ICC World Cup 2019 Final: विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला मिळणार पुरस्कार म्हणून इतके पैसे, टीम इंडिया ला सेमीफायनलसाठी मिळणार इतकी Prize Money)
किवी सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) 19 धावा करत बाद झाला. क्रिस वोक्स (Chris Woakes) याने गप्टीलला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर विलियमसन आणि हेन्री निकोलस (Henry Nicholls) यांनी अर्धशतकी भागिदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यानंतर लियाम प्लेंकेट (Liam Plunkett) याने कर्णधार केन 30 धावा करत बाद करत मोक्याच्या क्षणी इंग्लंडला विकेट मिळवून दिली. दुसरीकडे, रूट केवळ 7 धाव करू शकला. त्यामुळे हे दोघे सचिनचा विक्रम मोडण्याच्या जवळ देखील पोहचू शकले नाही. रोहितने यंदा सर्वांना मागे टाकत सर्वाधीक कपमध्ये 648 धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांना 100 किंवा जास्त धावांची गरज आहे रोहितला मागे टाकत सर्वाधिक धावा करण्याची गरज होती.
दरम्यान, किवीजने दिलेल्या 242 धावांचा पाठलाग करत इंग्लंड संघाने 3 बाद 77 धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आणि अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) खेळपट्टीवर इंग्लडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.