मुंबई: भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे फॉरमॅटमध्ये अनेक चमत्कार केले आहेत. रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा (264 धावा) आहे आणि या फॉरमॅटमध्ये 3 द्विशतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या 265 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,866 धावा केल्या आहेत आणि या कालावधीत त्याने 31 शतकेही ठोकली आहेत. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series: काय सांगता! बांगलादेशविरुद्ध कसोटीत रोहित शर्माची वाईट कामगिरी, तीन सामने खेळूनही करू शकला नाही 50 धावा)
रोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, परंतु क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एक विक्रम आहे जो लाजिरवाणाही आहे. रोहित शर्मा हा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जात असला तरी, त्याने अनेक झेलही सोडले आहेत आणि यामुळे वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे.
रोहितने वनडेमध्ये 36 झेल सोडले आहेत
रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 265 एकदिवसीय सामने खेळले असून यादरम्यान त्याने एकूण 36 झेल सोडले आहेत. म्हणजेच वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.
Not a stat that Rohit Sharma will be happy about🤔
Rohit Sharma has dropped the most catches in the ODI history followed by 2 Kiwi stars in Martin Guptill and Ross Taylor. pic.twitter.com/XZN6gEotjA
— Cricket.com (@weRcricket) August 15, 2024
मार्टिन गुप्टिल दुसऱ्या स्थानावर
या यादीत न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्टिल दुसऱ्या स्थानावर आहे. मार्टिन गुप्तलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 198 सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये त्याने 33 झेल सोडले.
रॉस टेलर तिसऱ्या स्थानावर
या यादीत न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलर देखील तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने किवी संघासाठी 236 एकदिवसीय सामने खेळले आणि त्याने 33 झेलही घेतले. गुप्टिलने कमी सामन्यांमध्ये 33 झेल सोडले असून त्यामुळे तो दुसऱ्या स्थानावर आहे.