Road Safety World Series T20 Match 1 Highlights: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या नेतृत्वाखाली India Legends संघाचा  West Indies Legends संघावर 7 विकेट राखून विजय; वीरेंद्र सेहवाग याची दमदार कामगिरी

भारतीय लीजेंड्स आणि वेस्ट इंडीज लीजेंड्स (India Legends vs West Indies Legends) यांच्यात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी -20 चा (Road Safety World Series T20 Match) पहिला सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानात (Wankhede) पार पडला आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय लीजेंड्स संघाने वेस्ट इंडीज लीजेंड्स संघाचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. सचिन तेंडुलकर यांने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रायन लारा यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल्या वेस्ट इंडीजच्या संघाने 20 षटकात भारतीय संघाला 151 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय संघाने 10 चेंडू शिल्लक ठेवत भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाला पराभूत केले. यात वीरेंद्र सेहवाग याने नाबाद 74 धावांची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली.

रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून रोड सेफ्टी साठी लोकांमध्ये जागृता निर्माण व्हावी, यासाठी वानखेडे मैदानात भारतीय लीजेंड्स आणि वेस्ट इंडीज यांच्यात क्रिकेट सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीज संघाने 20 षटकात 8 विकेट गमावून 150 धावा केल्या आहेत. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाकडून शिवनारायण चंद्रपॉल याने 61 केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर, डारेन गंगे यानेही 32 धावांची योग्य कामगिरी बजावली. वेस्ट इंडीजच्या संघाने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याच्या पाठलाग करत मैदानात उतरलेले भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. भारताच्या विजयात वीरेंद्र सेहवाग यांनी मोलाचा वाचा उचलला होता. भारताकडून वीरेद्र सेहवाग यांनी नाबाद 74 धावा केल्या. तर, कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी 39 चेंडूत 36 धावा केल्या आहेत. दरम्यान, मोहम्मद कैफ यांनी निराशाजनक कामगिरी केली. मोहम्मद कैफने 17, तर युवराज सिंहने 7 चेंडूत नाबाद 10 धावा ठोकल्या. वेस्ट इडीजच्या संघाकडून कार्ल हूपर यांनी सर्वाधिक 2 विकेट घेतले तर, सुलेमान बेन यांनी 1 विकेट पटकावली आहे. हे देखील वाचा- Road Safety World Series 2020 Traffic Advisory: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजनिमित्त मुंबई पोलिसांनी केले वाहतुकीमध्ये बदल; आज वानखेडे स्टेडियमवर भिडणार सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा

ट्वीट-

संघ-

भारतीय लीजेंड-

वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर (कर्णधार), मोहम्मद कैफ, समीर दिघे (यष्टीरक्षक), युवराज सिंग, इरफान पठाण, झहीर खान, मुनाफ पटेल, प्रज्ञान ओझा, साईराज बाहुले, मनप्रीत गोनी

वेस्ट इंडीज लीजेंड-

ब्रायन लारा (कर्णधार), शिवनारायण चंद्रपॉल, रिकार्डो पॉवेल, डॅरेन गंगे, रिडली जेकब्स (विकेटकीपर), कार्ल हूपर, डांजा हयात, पेड्रो कोलिन्स, सुलेमान बेन, दिनानाथ रामनारायण, टीनो बेस्ट

महाराष्ट्रात रस्ता अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच काही नागरिक विना हेल्मट वाहन चालवतात. यामुळे रस्ता अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. वाहन चालकांमध्ये जागृता निर्माण व्हावी, यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी -20 चे आयोजन करण्यात आले होते.