Photo Credit - X

IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात श्रीलकांने भारताचा 110 धावांनी पराभव करत 27 वर्षानंतर वनडे मालिकेवर कब्जा केला आहे. त्याआधी, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघ 26.1 षटकात सर्वबाद 138 धावा करु शकला. यादरम्यान, श्रीलंकेच्या डावात एक विचित्र घटना पाहायला मिळाली, ज्याने खेळाडूंसोबतच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. डावाच्या 49व्या षटकात ही घटना घडली.

ऋषभ पंतची मोठी चूक

तिसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली. पण त्याच्याकडून खराब यष्टिरक्षण दिसले. वास्तविक, कुलदीप यादवने श्रीलंकेच्या डावातील 49 वे षटक टाकले, तेव्हा महिष थेक्षाना आणि कामिंदू मेंडिस फलंदाजी करत होते. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने आपल्या शानदार चेंडूने महिष थेक्षानाला चकवले. यादरम्यान ऋषभ पंतने स्टंपिंग केले. पण त्याच्याकडून खुप मोठी चुक झाली. कुलदीप यादवच्या या षटकात महिष थेक्षाना क्रीजच्या खूप पुढे गेला होता आणि पंतकडे बराच वेळ होता. पण पंतने यष्टिरक्षणासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला. त्यामुळे महिश थेक्षाना क्रीझवर परतला आणि भारताला ही विकेट मिळवता आली नाही. पंतच्या या खराब स्टंपिंगमुळे आता सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे.

हे देखील वाचा: IND vs SL 3rd ODI: श्रीलंकेने 27 वर्षांनंतर भारताकडून एकदिवसीय मालिका जिंकली, टीम इंडियाच्या पराभवासाठी 'हे' खेळाडू ठरले जबाबदार

अंपायरनेही केली मोठी घोडचूक

ऋषभ पंतच्या स्टंपिंग नंतर मैदानावरील अंपायरने थर्ड अंपायरची मदत मागितली. पण रिप्लेमध्ये असे दिसून आले की, महिष थेक्षाना स्टंपिंगपूर्वीच क्रीझवर परतला होता, अशा स्थितीत तिसऱ्या पंचाला मोठ्या पडद्यावर नॉट आऊटचा सिग्नल देयाचा होता, पण चुकून आऊटचा सिग्नल दिला. ज्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. मात्र, ही चूक लवकरच सुधारून नॉटआऊटचे संकेत देण्यात आले.