Rishabh Pant Will Break MS Dhoni's Record: लवकरच ऋषभ पंत मोडणार महेंद्र सिंह धोनीचा 'हा' विक्रम; केवळ एक धावाची गरज
Rishabh Pant (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलिया आणि भारत (India Vs Australia 4th Test) यांच्यातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची खराब सुरुवात झाली. या सामन्यातील पहिल्या डावात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) केवळ 23 धावांची खेळी केली आहे. मात्र, तरीही ऋषभला भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडीत संधी निर्माण झाली आहे. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेगवान 1 हजार धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यात ऋषभ पंतने 999 धावा केल्या आहेत. यामुळे ऋषभ पंत लवकरच धोनीचा हा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे.

महेंद्र सिंह धोनीने कसोटी सामन्यातील 32 डावांत 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. धोनीने माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख इंजिनिअरने 36 डावांत एक हजार धावा केल्या आहेत. मात्र, ऋषभ पंतने केवळ 26 डावांत 999 धावा पूर्ण केल्या आहेत. यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी करिअरमध्ये 1 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ एक धावांची गरज आहे. ऋषभ पंतला गेल्या काही काळापासून धोनीचा उत्तराधिकारी मानले जात होते. हे देखील वाचा- IND vs AUS 4th Test 2021: वॉशिंग्टन सुदंर-शार्दूल ठाकूरने ऑस्ट्रेलियाला झोडपलं, ब्रिस्बेन टेस्टमध्ये मोडले अनेक विक्रम, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सुरूवातीला काहीशी डगमगली. पण तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत संघावरील दबाव कमी केला. भारताचा सलामीवीर शुबमन गिल अवघ्या 7 धावांवर आऊट झाला. त्यानंतर रोहित शर्मा (44), चेतेश्वर पुजारा (25), अजिंक्य रहाणे (37), मयंक अग्रवाल (38) आणि ऋषभ पंत (23) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी शतकी भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर एकेकाळी 6 बाद 186 अशी अवस्था असणाऱ्या भारतीय संघाला 336 धावांपर्यंत मजल मारता आली आहे.