 
                                                                 IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्ट सामन्यात पहिल्या दावत टीम इंडियाच्या (Team India) आघाडीच्या फलंदाजांना पॅव्हिलियनमध्ये पाठवत यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) वर्चस्व गाजवले. पण वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) शानदार भागीदारी करत कांगारू गोलंदाजांना धु...धू धुतलं. सुंदर आणि शार्दुलने सातव्या विकेटसाठी 123 धावांची मोलाची भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाला 369 धावांच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात 336 धावांपर्यंत मजल मारून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. यामुळे यजमान संघाला दुसऱ्या डावात फक्त 33 धावांची आघाडी घेतला आली. सुंदरने 62 धावा केल्या तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ठाकूरने 67 धावा केल्या. सुंदरने सात चौकार आणि एक षटकार खेचला तर ठाकूर त्याच्यापेक्षा थोडासा आक्रमक होता आणि त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले. आजच्या दिवशी दोन्ही खेळाडूंनी काही मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले जे खालिलप्रमाणे आहे. (IND vs AUS 4th Test 2021: तुला परत मानलं ठाकूर! शार्दूल ठाकूरच्या गब्बा टेस्टमधील निर्णायक खेळीचं विराट कोहलीने मराठमोळ्या अंदाजात कौतुक, पहा Tweet)
1. दत्तू फडकर यांच्यानंतर डेब्यू डावात तीन विकेट आणि 50 हुन अधिक धावा करणारा सुंदर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
2. सुंदर कसोटी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात 50हुन अधिक धावा आणि पहिल्या डावात 3 किंवा अधिक विकेट घेणाराआता दहावा खेळाडू ठरला आहे.
3. सुंदर आणि शार्दूलने ब्रिस्बेनच्या गब्बामध्ये सातव्या विकेटसाठी भारताकडून सर्वाधिक भागीदारीची नोंद केली आहे. दोंघांमध्ये 123 धावांची भागीदारी झाली.
4. कसोटी सामन्यात जोश हेझलवूडने 9 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत.
5. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण सामन्यात अर्धशतक कर्णधार सुदंर सहावा भारतीय ठरला. यापूर्वी, दत्तू पडकर, गुंडाप्पा विश्वनाथ, शिखर धवन, मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ही कामगिरी बजावली आहे.
6. टेस्ट क्रिकेटमध्ये 7व्या आणि 8व्या स्थानावर फलंदाजी करत अर्धशतकी खेळी करण्याची टीम इंडिया फलंदाजांची ही 12वी वेळ आहे.
सुंदर आणि ठाकूरनंतर मोहम्मद सिराजनेही 13 मौल्यवान धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने पाच विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या . डेविड वॉर्नर 20 तर मार्कस हॅरिस 1 धाव करून खेळत आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
