BCCI On Rishabh Pant: ऋषभ पंत लवकरच मैदानात परतण्याची शक्यता, बीसीसीआयची मोठी तयारी
Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

BCCI On Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा मैदानात येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पंतबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. वास्तविक ऋषभ पंतला चांगल्या उपचारांसाठी इंग्लंडला (England) पाठवण्यात येणार आहे. ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आयपीएलमध्ये (IPL 2024) परत येण्यास सक्षम आहे याची खात्री करण्यासाठी बीसीसीआय (BCCI) प्रयत्न करत आहे जेणेकरून 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता वाढेल. याआधी मोहम्मद शमी (Mohamaad Shami) आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) यांनाही इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून शमी आणि सूर्यकुमार यादव घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहेत.

ऋषभ पंत इंग्लंडला जाणार?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋषभ पंत इंग्लंडला जाणार आहे. मार्चच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातानंतर मैदानाबाहेर आहे, जरी तो सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये हरिद्वारला जाताना पंत यांचा कार अपघात झाला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर 45 दिवस त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2024: हैदराबादमध्ये खेळवला जाणार भारत - इंग्लड कसोटी मालिकेतील पहिला सामना, जाणून घ्या कोण आहे मजबूत दावेदार)

पंत दिल्ली कॅपिटल्सचे करणार नेतृत्व

कार अपघातानंतर ऋषभ पंत गेल्या वर्षी आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत संघाचा भाग होऊ शकला नाही. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंतच्या पुनरागमनाची आशा व्यक्त केली आहे. पंतने अद्याप सराव सुरू केलेला नाही, पण तो आयपीएल 2024 पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे. या हंगामात पंत संघाचे नेतृत्व करणार असल्याचे दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केले आहे.