IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांनी युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) विषयी काही खुलासे केले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14वा सत्र सुरू होण्यापूर्वी त्यांनी सांगितले की पृथ्वीने त्यांचे ऐकले नाही. मागील सत्रात जेव्हा पृथ्वी खराब फॉर्मशी संघर्ष करत होता तेव्हा त्याने नेट्समध्ये फलंदाजीला नकार दिला होता. भारताच्या या प्रतिभावान फलंदाजाने आगामी स्पर्धेपूर्वी त्याच्या प्रशिक्षणाच्या सवयीत सुधार केला असेल अशी अपेक्षाही पॉन्टिंगने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉन्टिंग 21 वर्षांच्या पृथ्वीबरोबर दिल्ली कॅपिटल्समध्ये मागील दोन सत्रापासून काम करत आहे. पाँटिंगने cricket.com.au सोबत बोलताना सांगितले की, जेव्हा पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्ममध्ये असतो त्यावेळी तो नेट्समध्यही सतत फलंदाजी करतो. पण, फॉर्म चांगला नसतो तेव्हा तो नेट्समध्येही फलंदाजी करण्यास नकार देतो. गेल्या हंगामात पृथ्वीने फलंदाजीचा सराव करण्यास नकार दिला होता त्याबाबत पाँटिंगने खुलासा केला. (IPL 2021: आयपीएलचा पुढील हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; ऑलराउंडर अक्षर पटेल याला करोनाची लागण)
पाँटिंग म्हणाला की, “त्याने चार-पाच सामन्यांत 10 पेक्षा कमी धावा केल्या होत्या त्यामुळे मी त्याला आपण नेट्समध्ये जायला हवं आणि नेमकी समस्या काय आहे ते शोधायला हवं असं म्हटलं. त्यावर त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून नाही, मी आज फलंदाजी करणार नाही असं उत्तर दिलं. मला हे कळलंच नाही”. पुढे पॉन्टिंगने म्हण्टलं की, “कदाचित आता तो बदलला असेल. मला माहितीये गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने बरीच मेहनत घेतलीये. त्याचा सिद्धांत बदलला असावा आणि मला आशा आहे हा बदल झाला असेल कारण आपण त्याच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करुन घेतली तर तो सुपरस्टार खेळाडू बनू शकतो.” माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला की, गेल्या वर्षी पृथ्वीला सल्ला देण्यापासून तो मागे हटला नाही, परंतु या युवा फलंदाज आपल्या मतावर ठामपणे उभा राहिला.
Exclusive: @DelhiCapitals head coach Ricky Ponting hopes to unlock the "superstar" potential of Indian young gun Prithvi Shaw, but hopes some of his training theories have changed ahead of #IPL2021 | @LouisDBCameron https://t.co/QC6qWR793B pic.twitter.com/hyc4v47gC2
— cricket.com.au (@cricketcomau) April 5, 2021
दिल्ली कॅपिटल्स यंदा चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मोसमाची सुरुवात करतील. दोन्ही संघातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दिल्लीसाठी महत्वाची बाब म्हणजे नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत यंदा रिषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे, 23 वर्षीय पंतच्या नेतृत्वात दिल्ली कुठपर्यंत पोहचते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.