IPL 2021: आयपीएलचा पुढील हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; ऑलराउंडर अक्षर पटेल याला करोनाची लागण
Axar Patel (Photo Credit: Twitter)

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला (IPL 2021) येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल 2021 मधून बाहेर पडला आहे. यातच दिल्लीच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, अक्षर पटेल पहिल्या दोन-तीन सामन्यातून मुकण्याची शक्यता आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षर हा विलगीकरण कक्षात गेला असून सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. कोलकाता नाईट राईडर्सचे खेळाडू नितीश राणा याच्यानंतर कोरोनाची लागण होणारा अक्षर पटेल दुसरा खेळाडू ठरला आहे. नितीश राणा याची 22 मार्च रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर गुरुवारी केलेल्या टेस्टमध्ये नितीश राणाची टेस्ट निगेटिव्ह आली होती. हे देखील वाचा- Most Runs in IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' 5 खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा; यादीत 4 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

एएनआयचे ट्वीट-

यावर्षी आयपीएलची स्पर्धा भारतातील 6 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. येत्या 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे आयपीएलचा पहिला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.