England vs Pakistan: पाकिस्तान आणि इंग्लंड (England vs Pakistan)यांच्यात 7 ते 28 ऑक्टोबर दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेद्वारे यजमान संघ आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी प्रयत्नात आहे. दोन्ही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलतान क्रिकेट स्टेडियमवर 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणारा पहिला कसोटी सामना होणार आहे. (हेही वाचा: Babar Azam Resigned: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा)
पहिल्या कसोटीसाठी, श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि बांगलादेशचे शराफुद्दौला सैकत, दोघे आयसीसी एलिट पॅनेल पंच आहेत. ते मैदानावरील पंचांची महत्त्वाची भूमिका बजावतील. न्यूझीलंडचे ख्रिस्तोफर गॅफनी आयसीसी एलिट पॅनेलचे भाग आहेत. ते तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर पाकिस्तानचे आसिफ याकूब चौथे पंच असतील.
मुलतानमध्ये 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान दुसरा कसोटी सामना धरमसेना मैदानावर होणार आहे. शराफुद्दौला सैकत हे तिसऱ्या पंचाची भूमिका निभावतील. तर आयसीसी आंतरराष्ट्रीय पॅनेलचे आणखी एक सदस्य पाकिस्तानचे रशीद रियाझ चौथ्या पंचाची भूमिका निभावतील. यानंतर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गफानी आणि शराफुद्दौला सैकत मैदानी पंचांची भूमिका बजावतील. या सामन्यात तिसऱ्या पंचाची जबाबदारी धरमसेनाकडे असेल, तर पाकिस्तानचा फैसल आफ्रिदी चौथ्या पंचाच्या भूमिकेत असेल.