वीरेंद्र सेहवागसह अन्य दोघांचा 'डीडीसीए'चा राजीनामा
विरेंद्र सेहवाग संग्रहित छायाचित्र (Photo: @virendersehwag/Twitter)

भारताचा माजी सलामीविर फलंदाज वीरेंद्र सेहवागने क्रिकेट समितीचा राजीनामा सोमवारी दिला. जिल्हा क्रिकेट संघाचे (डीडीसीए) हित ध्यानात घेऊन आपण राजीनामा देत असल्याचे सेहवागने म्हटले आहे. सेहवागशिवाय समितीचे इतर सदस्य आकाश चोपडा आणि राहुल संघवी यांनी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या रुपात मनोज प्रभाकरला कायम ठेवण्याची शिफारस केली होती. मात्र, त्याला मान्यता मळाली नाही.

दरम्यान, सेहवागने संघाचे हित विचारात घेऊन डीडीसीएचा राजीनामा देत असल्याचे म्हटले खरे. पण, त्याच्या राजीनाम्यामागे केवळ संघाचे हित हेच कारण आहे की, आणखी काही वेगळे कारण आहे, याबाब समजू शकले नाही. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सेहवाग, चोपडा आणि संघवी या तिघांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. डीडीसीएला येत्या दोन दिवसांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवा अहवाला सादर करायचा आहे. त्यानंतर नव्या समितीची स्थापना होईल.

प्रसारमाध्यमांनी सेहवागला विचारले की, प्रभाकर यांची नियुक्ती झाली नाही म्हणून आपण राजीनामा दिला काय? या प्रश्नावर सेहवाग म्हणाला, आम्ही सर्व सोबत आलो आणि आमचा वेळ दिला. क्रिकेट समितीच्या रुपात घालून दिलेल्या सर्व मर्यादा पाळत संघाची कामगिरी सुधारण्यासाठी आम्हाला जे जे शक्य ते ते सर्व प्रयत्न केले. आम्ही तिघेही आपापल्या व्यक्तिगत कामात व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही हवा तितका वेळ देऊ शकत नाही, म्हणूनच पदाचा राजीनामा दिला आहे, असेही सेहवागने स्पष्ट केले.

दरम्यान, असंही बोलले जात आहे की, कर्णधार गौतम गंभीर प्रभाकर यांच्या नियुक्तीच्या विरोधात होता. कारण, त्यांचे नाव सन २०००च्या मॅच फिक्सिंग प्रकरणात आले होते.