रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या आवृत्तीचा आज, शनिवारी पहिला डबल हेडर असेल. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. हा सामना अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद स्टेडियमवर दिवसा खेळला जाईल. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होईल. टॉस अर्धातास आधी म्हणजे 3:00 वाजता होईल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी अशा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम हॉटस्टारवर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (Virat Kohli-AB de Villiers Friendship: RCB कर्णधार विराट कोहली भावुक, एबी डिव्हिलियर्स सोबतच्या मैत्रीचे मोजक्या शब्दात केले वर्णन See Post)

यापूर्वी झालेल्या टीमच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, बेंगलोरने मुंबई इंडियन्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला तर राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. शेवटचा सामना विराटच्या संघासाठी एक धडा होता, ज्यामध्ये त्यांना चुका करूनही सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा पराभव करण्यात यश आले. विजयामुळे बेंगलोरला नक्कीच आत्मविश्वास मिळाला असेल ज्याचा त्यांना राजस्थानविरुद्ध उपयोग होईल. दुसरीकडे, राजस्थानला त्यांच्या फलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. राजस्थानची बॅटिंग त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांवर अवलंबून आहे. एका सामन्यात राहुल तेवतियाने चमत्कारक फलंदाजी करत एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारून संघाला पराभवापासून वाचवले.परंतु चमत्कार दररोज घडत नाहीत. रॉबिन उथप्पा आजवर अपयशी ठरला आहे. युवा रियान पराग देखील धावा करण्यात अपयशी ठरला आहे. एकूणच राजस्थानला फलंदाजीच्या मधल्या फळीत आणि निम्न फळीत मजबूत फलंदाजांची आवश्यकता असेल.

पाहा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सचा संघ:

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कॅप्टन), आरोन फिंच, देवदत्त पड्डीकल, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झांपा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

राजस्थान रॉयल्स: स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंह, श्रेयस गोपाल, वरुण एरॉन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनादकट, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, डेविड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँड्र्यू टाय आणि टॉम कुरन.