RCB vs PBKS (Photo Credit - X)

RCB vs PBKS Live Score Updates of IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)   आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात सामना सुरू आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांसाठी सामना प्रत्येकी 14-14 ओवर्सचा करण्यात आला आहे. बंगळुरूचा संघ अवघ्या 12 षटकांत ढेपाळला. विराट कोहलीसह, कृणाल पांड्या अवघी 1 धाव करून पव्हेलीयमध्ये परतले. इतर खेळाडूंनीही चांगले प्रदर्शन केले नाही. टीम हेव्हीडने अर्धशतक केले. तर कर्णधार रजत पाटीदार ने 23 धावाकरून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

पंजाबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अर्शदिप सिंग, यजुवेंद्र चहल, मार्को जॅनसेन यांनी घेतल्या प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. 14 षटकांचा हा डाव त्यांनी अवघ्या 12 षटकांत संपवला. बेंगळुरूमध्ये सकाळपासूनच पावसाचे सावट होते. पावसामुळे तेथे आरसीबी आणि पंजाब यांच्यातील टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. इंडियन प्रीमियर लीग 2025चा 34 वा सामना आज शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज  यांच्यात आयोजित करण्यात आला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

बेंगळुरूमध्ये पावसामुळे टॉसही वेळेत होऊ शकला नव्हता. काही वेळापूर्वी पाऊस थांबला. यामुळे नाणेफेक झाली आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबल्यानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ग्राउंड स्टाफकडून मैदान खेळण्यासाठी तयार करण्यात आले. त्यामुळे उशीरा सामना सुरू झाला. गुणतालीकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे आणि पंजाब संघ चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी 6-6 सामने खेळले आहेत आणि 4-4 असे जिंकले आहेत.