IPL 2020 Mid-Season Prediction: CSK पहिल्यांदाच प्ले-ऑफमधून बाहेर पडणार? आयपीएलच्या तेराव्या हंगामात RCB पहिल्या 4 मध्ये जागा निश्चित करण्याच्या तयारीत
विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी (Photo Credit: Twitter/PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रिमिअर लीग (India Premier League 2020) यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 28 सामने पूर्ण झाले आहेत. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सर्वांना आकर्षित केले आहे. मात्र, आयपीएल प्रत्येक हंगामात सर्वोकृष्ट कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यावर्षी गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहेत. यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईच्या  संघाला प्ले-ऑफमध्ये जागा मिळवता येणार की नाही? अशी भिती चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळरुचा संघ प्ले-ऑफमध्ये जागा निश्चित करण्याच्या तयारीत आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. मुंबईच्या तुलनेत सरासरी रेट कमी असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ 10 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबईची सरासरी +1.327 तर दिल्लीची +1.038 इतकी आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असून त्यांचे देखील 10 गुण आहेत पण सरासरी -0.116 इतकी आहे. यामुळे यंदाचा आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली यांनी प्ले-ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. सध्या कोलकाता नाईट राईडर्स 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानवर सनरायजर्स हैदराबाद आहे. हैदराबादने 7 सामने खेळले असून यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यानंतर सहाव्या स्थानावर राजस्थानचा संघ असून त्यांनीदेखील सातपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. हैदराबादचा संघाची सरासरी +0.153 तर दिल्लीची -0. 872 इतकी आहे. हे देखील वाचा- MS Dhoni Becomes T20 King: स्पोर्ट्स फ्लॅशने केलेल्या सर्वेक्षणात महेंद्रसिंह धोनी ठरला टी-20 चा किंग

आयपीएल पॉईंट टेबल- 

महत्वाचे म्हणजे, आयपीएलच्या प्रत्येक हंगामात पहिल्या चारमध्ये असणार चेन्नईचा संघ यंदा सातव्या स्थानावर आहेत. त्यांना सात सामन्यात केवळ 2 विजय मिळवता आला आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर फक्त एक विजय असून ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहेत.