WPL 2023, RCB vs DC Live Streaming: WPL च्या दुसऱ्या सामन्यात RCB आणि दिल्लीचा संघ भिडणार, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना
Tata WPL (Photo: Twitter)

आज महिला प्रीमियर लीगमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात होणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता दोन्ही संघामध्ये हा सामना होणार आहे. जिथे आरसीबीचे नेतृत्व स्मृती मानधना करत आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंगकडे आहे. दोन्ही संघ एकापेक्षा एक अनुभवी खेळाडूंनी भरलेले आहेत. आरसीबीकडे एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष आणि रेणुका सिंग यासारखे दिग्गज खेळाडू आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स संघात जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा आणि मारिजाने कॅप सारख्या दिग्गज खेळाडू आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमधील हा सामना निकराचा ठरू शकतो.

महिलांना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमला ​​भेट देऊनही क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहता येईल. महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांसाठी महिला आणि मुलींसाठी प्रवेश विनामूल्य आहे. पुरुषांसाठी सामन्याची तिकिटेही खूप स्वस्त आहेत. कोणताही पुरुष क्रिकेट चाहता ब्रेबॉर्न स्टेडियमवर केवळ 100 रुपयांमध्ये या सामन्याचा आनंद घेऊ शकतो. (हे देखील वाचा: WPL 2023 RCB vs DC: आज आरसीबी आणि दिल्ली यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गजांकडे)

कुठे पाहणार सामना?

Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. अशा परिस्थितीत सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. चाहत्यांना Jio Cinema अॅपवर या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहता येणार आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आरसीबी संघ: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), दिशा कासट, श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, पूनम खेमर, मेगन शुट, रेणुका सिंग.

दिल्ली कॅपिटल्स संघ: शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मेग लॅनिंग (कर्णधार), मारिजाने कॅप, लॉरा हॅरिस, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव.