Ravichandran Ashwin Became First Bowler Take 50 Wickets in 3 WTC Season : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या आतापर्यंतच्या तिन्ही हंगामात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कानपूरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी अश्विनने आणखी एक मोठा पराक्रम केला. तिन्ही हंगामात 50 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेश संघाच्या पहिल्या डावात शकीब अल हसनला बाद करताच त्याच्यानावावर हा विक्रम नोंदवला गेला. (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Virat Kohli च्या 27,000 धावा पूर्ण; BCCI सचिव Jay Shah कडून अभिनंदन, म्हणाले 'लाखो लोकांना प्रेरित करणार प्रवास!')
अश्विनची आतापर्यंतची कामगिरी
रविचंद्रन अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला, ज्याने तिन्ही हंगामात 50 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात अश्विनने आतापर्यंत 52 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामापासून तिसऱ्या चक्रापर्यंत गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अश्विनने 2029 ते 2021 या कालावधीत खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगाामात 14 सामने खेळले आणि 71 विकेट्स घेण्यात यश मिळवले.
यानंतर 2021 ते 2023 या कालावधीत खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामात अश्विनने 13 सामने खेळताना एकूण 61 विकेट्स घेतल्या. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामात आतापर्यंत अश्विनने 10 सामने खेळून 52 विकेट घेतल्या आहेत, ज्यात आणखी वाढ होण्याची खात्री आहे. याशिवाय अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिन्ही हंगामात एकूण 184 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याला नॅथन लॉयनच्या पुढे जाण्याची मोठी संधी आहे, ज्यासाठी अश्विनला आणखी फक्त 4 विकेट्स घ्यायच्या आहेत.
आतापर्यंत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 102 सामने खेळताना 526 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 191 डावांमध्ये 263 वेळा उजव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले आहे. तसेच त्याने डाव्या हाताच्या फलंदाजांनही 263 वेळा बाद केले आहे.