आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Virat Kohli च्या 27,000 धावा पूर्ण; BCCI सचिव Jay Shah यांच्या कडून अभिनंदन, म्हणाले 'लाखो लोकांना प्रेरित करणार प्रवास!'
भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 रा कसोटी सामना सुरू आहे. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 27,000 धावा पूर्ण केल्या आहेत. असा रेकॉर्ड करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर यांच्या नंतर विराट कोहलीने स्थान पटकावले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी विराट कोहलीचे(Virat Kohli ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. 30 सप्टेंबर रोजी IND vs BAN 2 री कसोटी 2024 च्या चौथ्या दिवशी फलंदाजी करताना विराट कोहलीने 27,000 धावांचा टप्पा गाठला. असा रेकॉर्ड करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर यांच्या नंतर विराट कोहलीने स्थान पटकावले आहे. त्यामुले लवकरच तो सचिन तेंडुलकरला मागे टाकेल अशी शक्यता आहे. 'X' ला घेऊन,आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवनिर्वाचित अध्यक्ष जय शाह(Jay Shah) यांनी लिहिले की , 'विराट कोहली यांनी 27,000 धावा पार करत कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! गाठला. तुमची आवड, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची भूक प्रेरणादायी आहे. हा प्रवास लाखो लोकांना प्रेरणा देत आहे!'
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Virat Kohli च्या 27,000 धावा पूर्ण
Another towering milestone in the illustrious career of Virat Kohli as he crosses 27,000 international runs! Your passion, consistency, and hunger to excel are inspiring to the cricketing world. Congratulations @imVkohli, the journey continues to inspire millions! 🇮🇳
— Jay Shah (@JayShah) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2024 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

