Video: रवि शास्त्री यांनी आनंदाच्या भरात वापरली कमरेखालची भाषा; लाईव्ह मुलाखतीदरम्यान घडला प्रकार
रवि शास्त्री | (Photo courtesy: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri ) यांना भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया (Australia) येथील एडिलेड मैदानात केलेल्या कामगिरीचा जोरदार आनंद झाला. पण, या आनंदाचा उत्साह शब्दात व्यक्त करताना त्यांना आपण लाईव्ह मुलाखतीसाठी प्रसारमाध्यमांसमोर उभे असल्याचा विसर पडला. त्यांनी बोलता बोलता काही भलतेच शब्द वापरले. ज्याचा आम्ही येथे उल्लेख करु शकत नाही. जिज्ञासू मंडळी बातमीतला व्हिडिओ जरुर पाहू शकतात.

एडिलेड येथे झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्या सुरु झालेलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १० धावांनी पराभूत केले. या मैदानावर भारतीय संघाला तब्बल 15 वर्षांनतर यश मिळाल्यामुळे रवि शास्त्री यांचे आनंदी होणे समजण्यासारखे होते. पण, म्हणून त्यांच्या शब्दप्रयोगांचे समर्थन करता येऊ शकत नाही. सोशल मीडियावर नेटिझन्सनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया हेच दर्शवतात. (हेही वाचा, ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम)

भारतीय संघ विजयी झाल्यानंतर रवि शास्त्री मैदानावर आले. त्यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी संवाद साधला. या संवादादरम्यान, शास्त्री यांनी जी भाषा वापरली ते पाहून नेटकरी चांगलेच भडकले. गावस्क यांच्यासोबत लाईव्ह मुलाखतीदरम्यान बोलताना ते म्हणाले, मी हिंदीतून काही सांगू इच्छितो, 'बिल्कूल नही छोडेंगे .....' या वाक्याच्या पुढे त्यांनी जे शब्द वापरले यावरुन ते चांगलेच ट्रोल झाले. त्यांना गावसकर यांनी विचारले ड्रेसिंग रुम मधले वातवारण कसे होते, यावर शास्त्री म्हणाले, 'आम्हाला माहिती होते की, आम्ही सामना हारणार नाही, पण काही वेळासाठी आमची गो... तोंडात आली होती.'