तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अलीकडील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागल्या असताना, देशाच्या क्रिकेट बोर्डाने (ACB) गुरुवारी टी -20 विश्वचषक संघ जाहीर केले. त्यानुसार, अष्टपैलू खेळाडू रशीद खानला (Rashid Khan) कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तर, अनुभवी यष्टीरक्षक मोहम्मद शहजादचाही संघात समावेश करण्यात आला. अफसर झझाई आणि फरीद अहमद मलिक हे 2 स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, एसीबीकडून टी-20 विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघाच्या घोषणेनंतर काही वेळातच रशीद खानने अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
राशीदने नुकताच केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, "कर्णधार आणि राष्ट्रासाठी जबाबदार व्यक्ती म्हणून मी संघ निवडीचा भाग होण्याचा अधिकार राखून ठेवतो. निवड समिती आणि एसीबीने एसीबी माध्यमांद्वारे जाहीर केलेल्या संघासाठी माझी संमती घेतली नाही. मी अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हे देखील वाचा- T20 World Cup 2021: टी20 विश्वचषकासाठी MS Dhoni ला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्यानंतर गौतम गंभीरने दिली प्रतिक्रिया, वाचा नक्की काय म्हणाला गंभीर ?
ट्वीट-
🙏🇦🇫 pic.twitter.com/zd9qz8Jiu0
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 9, 2021
ट्वीट-
Afghanistan National Cricket Team Squad for the World T20 Cup 2021. pic.twitter.com/exlMQ10EQx
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 9, 2021
दरम्यान, तालिबानने महिलांना खेळ खेळू देत नसल्याच्या प्रसारमाध्यमांच्या अहवालांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेट संबंधित चिंता व्यक्त केली.
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. जर तालिबान अफगानिस्तान मधील महिला क्रिकेटवर बंदी आणणार असेल तर ते नोव्हेंबरमधील हा कसोटी सामना रद्द करतील, असा इशाराही क्रिकेट ऑस्ट्रेलिया दिला आहे.