Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारतात आहे. जिथे ती ग्रेटर नोएडा येथे न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळत आहे. मात्र, पावसामुळे हा सामना अद्याप पूर्ण झालेला नाही. यावरून बराच गदारोळ होत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तानने संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तानचा 17 सदस्यीय संघ 18 सप्टेंबरपासून यूएईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (हे देखील वाचा: BAN Test Squad Against IND 2024: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, पाकविरुद्ध इतिहास रचणाऱ्या खेळाडूंना मिळाली संधी)
राशिद खानचे पुनरागमन
अफगाणिस्तान संघात स्टार खेळाडू राशिद खानचे पुनरागमन झाले आहे. रशीद दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. इब्राहिम झद्रान आणि मुजीब उर रहमान हे दोन मजबूत खेळाडूही संघात नसतील. झाद्रान घोट्याच्या दुखण्याने बाहेर आहे. तर मुजीबच्या उजव्या पायाला मोच आली आहे. मात्र, त्यांच्यातील कमतरता भरून काढण्यासाठी युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
Happy with our Squad for the @ProteasMenCSA ODIs? 🏏
🔗: https://t.co/J6TIZnLWIT#AfghanAtalan | #AFGvSA | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/rFBh6Et27l
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 12, 2024
Hashmatullah Shahidi will lead Afghanistan for their maiden ODI series against South Africa.https://t.co/3RbXf6HB6p
— ICC (@ICC) September 12, 2024
दोन युवा खेळाडूंना मिळाले स्थान
दोन स्टार खेळाडू आऊट झाल्यामुळे युवा खेळाडू आणि उजव्या हाताचा आघाडीचा फलंदाज अब्दुल मलिकला स्थान देण्यात आले आहे. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. दुसरीकडे सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या दरवेश रसूलीलाही स्थान मिळाले आहे. संघाचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदीकडे असेल. तर रहमत शाहला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
येथे पाहा वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना 18 सप्टेंबर 2024 बुधवार शारजाह क्रिकेट स्टेडियम, यूएई
दुसरा एकदिवसीय सामना 20 सप्टेंबर 2024 शुक्रवार शारजाह क्रिकेट स्टेडियम, यूएई
तिसरा एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर 2024 रविवार शारजाह क्रिकेट स्टेडियम, यूएई
अफगाणिस्तान एकदिवसीय संघ
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यूके), इकराम अलीखिल (डब्ल्यूके), अब्दुल मलिक, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रियाझ हसन, दरविश रसूली, गुलबदीन नायब, रशीद खान, नांग्याल खरोती. अल्लाह मोहम्मद गझनफर, फजल हक फारुकी, बिलाल सामी, नवीद झदरन आणि फरीद अहमद मलिक.