कसोटी क्रिकेटमधील सर्वात युवा कर्णधार म्हणून ओळखल्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये चमत्कारिक शॉटमुळे अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान (Rahid Khan) आता चर्चेत आला आहे. शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये राशिदने झिम्बाब्वेविरुद्ध चटगांव येथे खेळल्या गेलेल्या टी-20 मॅचमध्ये खेळल्या गेलेल्या शॉटची सोशल मीडियावर भरभरुन प्रशंसा होत आहे. 20 व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 152 धावांत 6 गडी गमावले तेव्हा रशीदच्या बॅटमधून हा आगळा वेगळा शॉट 20 व्या ओव्हरदरम्यान निघाला. यावेळी, कॉमेंटेटरदेखील ही राशिदच्या या टेनिस शॉटचे कौतुक केल्याशिवाय जगू शकले नाहीत. (हॅमिल्टन मसकद्जा याने रचला इतिहास; अंतराराष्ट्रीय टी-20 क्रिकेट करिअरमधील अखेरच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला)
क्रिसने षटकातील पहिला बॉल थोडासा शॉर्ट टाकला. त्याच्यावर रशीदने थोडे पुढे पुढे जाऊन टेनिस स्टाईलचा शॉट्स खेळला आणि चेंडू थेट एका षटकारापर्यंत गेला. या शॉटचा व्हिडिओ राशिदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून तो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रशीदच्या या शॉटची तुलना बर्याच यूजर्सने महान टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याच्या टेनिस शॉटशी केली. पहा रशीदच्या दमदार शॉटचा 'हा' व्हिडिओ:
🎾🎾🙈🙈😍🇦🇫🇦🇫✌🏻✌🏻✌🏻 pic.twitter.com/x6AhLQwTWi
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 21, 2019
राफा नडाल शॉट
Rafeal nadal shot♥
— Ali Khan (@AliKhan71123387) September 21, 2019
टेनिस क्रिकेट शॉट
Tennis Cricket shot...
— Bhavin Mahyavanshi (@BhavinMahyavans) September 21, 2019
या सामन्यात राशिदने 6 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 9 धावा केल्या. तर, रहमानुल्ला गुरबाज याच्या 62 धावांची संघाचा डाव सावरला, ज्यामुळे अफगाणिस्तानला 8 विकेट्स गमावून 155 धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मसाकडजा याच्या 71 धावांच्या तुफानी डावामुळे त्यांना सामना 7 विकेटने जिंकला. या मॅचनंतर हॅमिल्टनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या तिरंगी मालिकेतील झिम्बाब्वेचा हा पहिला विजय होता.