Ranji Trophy Knockouts New Schedule: रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचे नवे वेळापत्रक BCCI कडून जारी, सर्व सामने दोन दिवसांनी लांबले; जाणून घ्या नवीन शेड्युल
रणजी ट्रॉफी (Photo Credit: Twitter/BCCIDomestic)

Ranji Trophy Knockouts New Schedule: बीसीसीआयने (BCCI) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या बाद फेरीच्या सामन्यांचे नवीन वेळापत्रक जारी केले आहे. आता सर्व बाद फेरीचे सामने दोन दिवस उशिराने सुरू होतील. 6 जूनपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होतील तर 22 जूनपासून अंतिम सामना सुरु होतील. बीसीसीआयने सर्व राज्यांच्या क्रिकेट बोर्डांना परिपत्रक जारी करून उपांत्य फेरीचे सामने दोन दिवस उशिरा म्हणजे 12 जूनऐवजी 14 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना बेंगलोरच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाईल. (Ranji Trophy 2022 Knockout Schedule: रणजी करंडक बाद फेरीचे वेळापत्रक जारी, उपांत्य फेरीत मुंबई उत्तरराखंडशी भिडणार)

रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश संघ बाद फेरीत पोहोचले आहेत. आयपीएलच्या चालू हंगामापूर्वी रणजी ट्रॉफीचे साखळी सामने खेळवले गेले. तसेच बाद फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यामागे बीसीसीआयने अद्याप कोणतेही कारण दिलेले नाही. रणजी ट्रॉफीच्या जुन्या वेळापत्रकानुसार बाद फेरीचे सामने 4 जूनपासून सुरू होणार होते. यापूर्वी बीसीसीआयने आयपीएल 2022 नंतर नॉकआऊट सामने खेळवले जातील असे सांगितले होते, परंतु तारीख देण्यात आली नव्हती. मात्र, आता नवीन वेळापत्रकानुसार बीसीसीआयने की सर्व सामने बायो बबलमध्ये असतील परंतु खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय RTPCR चाचणीत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर खेळाडू थेट त्यांच्या संघांशी संपर्क साधू शकतील. मात्र, मैदानावर प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.

वेळापत्रक:

उपांत्यपूर्व फेरी: जून 6-10

पहिला उपांत्यपूर्व फेरी: बंगाल विरुद्ध झारखंड

दुसरा उपांत्यपूर्व फेरी: मुंबई विरुद्ध उत्तराखंड

तिसरा उपांत्यपूर्व फेरी: कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश

चौथा उपांत्यपूर्व फेरी: पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश

उपांत्य फेरी: 14-18 जून

अंतिम: जून 22-26.