Ranji Trophy 2022 Knockout Schedule: रणजी करंडक बाद फेरीचे वेळापत्रक जारी, उपांत्य फेरीत मुंबई उत्तरराखंडशी भिडणार; वाचा सविस्तर
यश धुल (Photo Credit: PTI)

Ranji Trophy 2022 Knockout Schedule: रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) बाद फेरीचे वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) जाहीर केले आहे. यावर्षी दोन टप्प्यात खेळले जाणारे रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचे (Ranji Trophy Knockout) सामने बेंगळुरू येथे होणार आहेत. 4 जूनपासून बाद फेरीचे सामने सुरु होतील तर 20 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल. रणजी ट्रॉफीचा लीग टप्पा सध्या सुरू असलेल्या आयपीएल सुरू होण्यापूर्वी खेळला गेला होता आणि बीसीसीआयने  (BCCI) सांगितले होते की टी-20 लीगनंतर बाद फेरी खेळली जाईल. तसेच अलीकडे, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला की खेळाडू आगामी आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी बायो बबलमध्ये नसतील परंतु रणजी ट्रॉफी खेळाडूंसाठी असे होणार नाही. अनिवार्य क्वारंटाईन कालावधी नसला तरी सर्व संघांची नकारात्मक RT-PCR चाचणी असणे गरजेचे आहे आणि स्पर्धेचा अंतिम सामना बायो बबलमध्ये होईल. (Ranji Trophy: झारखंड संघाच्या धावांचा ‘एव्हरेस्ट’, नागालँडविरुद्ध 31 वर्षे जुना विक्रम धुळीस मिळवला; कुशाग्र, विराट आणि नदीम यांनी केली कमाल)

रणजी ट्रॉफीच्या चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने 4 ते 8 जून दरम्यान खेळवले जातील. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत बंगालचा सामना झारखंडशी होणार आहे. विक्रमी 41 वेळा रणजी चॅम्पियन मुंबई संघाचा सामना उत्तराखंडशी तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भिडतील. चौथा उपांत्यपूर्व सामना पंजाब आणि मध्य प्रदेश यांच्यात होणार आहे. 12 ते 16 जून दरम्यान दोन उपांत्य फेरी खेळल्या जातील, तर प्रतिष्ठित देशांतर्गत चॅम्पियनशिपची शिखर लढत 20 जूनपासून खेळली जाईल. बंगाल आणि सौराष्ट्र हे मागील रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. आणि सौराष्ट्राने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेत रणजीचा किताब जिंकला होता. कोविड-19 महामारीमुळे रणजी करंडक 2020-21 हंगाम प्रथमच रद्द करण्यात आला आणि अखेरीस दोन वर्षांनी कडक वेळापत्रकात 2021-22 हंगामात परत आणण्यात आला. चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसली तरी, भारतभर या स्पर्धेची लोकप्रियता गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाढली आहे.

रणजी ट्रॉफी कॉकआउट वेळापत्रक

4-8 जून: पहिला उपांत्यपूर्व सामना: बंगाल विरुद्ध झारखंड

4-8 जून: दुसरी उपांत्यपूर्व सामना: मुंबई विरुद्ध उत्तराखंड

4-8 जून: तिसरी उपांत्यपूर्व सामना: कर्नाटक विरुद्द उत्तर प्रदेश

4-8 जून: चौथी उपांत्यपूर्व सामना: पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश

12-16 जून: पहिला सेमीफायनल: QF1 विरुद्ध QF4 चा विजेता

12-16 जून: दुसरा सेमीफायनल: QF2 विरुद्ध QF3 चा विजेता

20-24 जून: फायनल