Ranji Trophy Final: रणजी ट्रॉफीत मध्य प्रदेशचा दुष्काळ 67 वर्षांनी हटला, अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करत 6 गडी राखून विजय
Madhya Pradesh win first Ranji Trophy(Photo credit: Twitter)

Ranji Trophy 2021-22: रणजी ट्रॉफीसाठी झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघाने मुंबईचा पराभव केला आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश अशी अंतीम लढाई झाली. या लढाईत मध्य प्रदेशने 6 विकेट्सनी मुंबईचा पराभव केला. विशेष म्हणजे इतिहासात मध्य प्रदेशने प्रथमच हा किताब जिंकला आहे. शेवटच्या दिवशी मुंबईने विजयासाठी मध्यप्रदेश समोर 108 धावांचे लक्ष ठवले होते. जे मध्य प्रदेशने 29.5 षटकांच्या बदल्यात पूर्ण केले. मध्य प्रदेशच्या या विजयाचे खरे शिल्पकार यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार हे ठरले. या तिघानी पहिल्याच डावात शतकी खेळी करत सामन्यावर पकड मजबूत बनवली. मध्य प्रदेशच्या या विजयामुळे पाठिमागील 67 वर्षांचा इतिहासातील पदकाचा दुष्काळ हटवला आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर मुंबईने प्रथम फलंदाजी करत सरफराज खानच्या शतकावर दमदार 374 धावा बनवल्या. तर मध्य प्रदेशने पहिल्याच डावात 536 धावा झळकावत 162 धावांची आघाडी घेततली. ज्यामुळे मध्य प्रदेशची सामन्यावर पकड मजबूत झाली. मध्य प्रदेशच्या यशासाठी यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतक ठोकले. (हेही वाचा Rohit Sharma Corona Positive: रोहित शर्माला कोरोनाची लागण, बीसीसीआयने ट्विट करत दिली माहिती)

ट्विट

पहिल्या सामन्यात काहीशी पाठिमागे पडलेला मुंबई संघ काहीसा ढेपाळला होता. नियमानुसार जर 5 व्या दिवशी अंतिम सामन्याचा निकाल आला नसता तर पहिल्यांदा जो संघ आघाडी घेतो त्याला विजयी मानले जाते. दुसऱ्या फेरीत मुंबई संघाने काहीशी आक्रमक खेळी करत 269 धावा जमवल्या. पण पुढे खेळी उदास राहिली. कुमार कार्तिकेय याने 4 गडी घेऊन मुंबईचा संघ खिळखिळा केला. 108 धावांचे सोपे लक्ष्य एमपीने 30 व्या षटकात एक चेंडू राखून गाठले. हिंमांशू याने या काळात 37 ते शुभम आणि पाटीदार याने 30-30 धावा केल्या. पाटीदारने विजयी फटका मारला आणि तो नाबाद राहिला.