रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या डावात चंडीगढ (Chandigarh) संघाने देशात खेळल्या जाणार्या प्रथम श्रेणी सामन्यात चौथी सर्वात मोठी पहिल्या डावातील आघाडी घेतली. चंदीगडने रणजी ट्रॉफीच्या राऊंड 9 च्या पहिल्या डावात मणिपूर (Manipur) विरुद्ध प्लेट ग्रुपमध्ये 672 धावा केल्या. कोलकाता मधील सॅलटायर मधील व्हिडिओकॉन अकादमीचे मैदानात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मणिपूरने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मणिपूरविरुद्ध गोलंदाजी करत चंडीगढने त्यांना पहिल्या डावात 63 धावांवर ऑलआऊट केले आणि पहिल्या डावाच्या आधारावर 609 धावांची आघाडी घेतली. भारतीय क्रिकेटमध्ये आजवर फक्त 3 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये धावांच्या तुलनेत संघांनी पहिल्या डावात मोठ्या धावांची आघाडी घेतली आहे. (Every Indian Should Know Hindi! सुनील गावस्कर यांच्या हिंदी भाषेवरून रणजी ट्रॉफी सामन्यात झाला वाद, म्हणाले भारतात राहणाऱ्यांना हिंदी येणे गरजेचं, (Watch Video))
स्वातंत्र्यपूर्व काळात, होलकरने 912/8 धावांवर डाव घोषित केला. आणि नंतर म्हैसूरविरुद्ध 722 धावांची आघाडी घेतली. होळकरने म्हैसूरला 1945-46 च्या एका सामन्यात 190 धावांवर ऑलआऊट केले. नंतर, 1993-94 च्या मोसमात, हैदराबादने आंध्र प्रदेशला 263 धावांवर बाद करत प्रथम डावात 681 धावांची आघाडी घेतली. सिकंदराबादच्या जिमखाना मैदानावर हैदराबादने 6 बाद 944 धावांवर डाव घोषित केला. 2014-15 क्रिकेट हंगामात कर्नाटकने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर तमिळनाडूला 134 धावांवर ऑलआऊट केले आणि 628 धावांची आघाडी मिळवली. दरम्यान, जगातील पहिल्या श्रेणी क्रिकेट सामन्यात घेतल्या जाणार्या पहिल्या डावातील सर्वात मोठ्या आघाडीचा विक्रमाची नोंद व्हिक्टोरियाच्या नावावर आहे. 1926-27 हंगामात व्हिक्टोरियाने मेलबर्न क्रिकेट मैदानावर न्यू साउथ वेल्सविरुद्ध 1107 धावा केल्या आणि त्यानंतर त्यांना 221 धावांवर ऑलआऊट करत 886 धावांची आघाडी घेतली होती.
Highest first innings lead in a Ranji match:
722 Holkar vs Mysore (1945/46)
681 Hyderabad vs Andhra (1993/94)
628 Karnataka vs Tamil Nadu (2014/15)
609 Chandigarh vs Manipur (2019/20)*
607 Meghalaya vs Sikkim (2018/19)#RanjiTrophy
— #NZvIND #NZvIND #INDvsNZ #NZvsIND #INDvNZ (@StarScoreInfo) February 13, 2020
कर्णधार मनन वोहरा (Manan Vohra) 9 धावांवर तर सलामीवीर कुणाल महाजन (Kunal Mahajan) 4 धावांवर बाद झाल्याने चंदीगडची अवस्था 9 बाद 42 अशी झाली होती. मात्र, रमण बिश्नोई (Raman Bishnoi) कडून अर्धशतक आणि विकेटकीपर फलंदाज उदय कौल (Uday Kaul) च्या 148 धावांनी चंदीगडला मजबूत स्थितीत नेले. बिपुल शर्मा आणि गुरिंदर सिंह यांच्या दुहेरी शतकाच्या जोरावर त्यांनी मणिपूरवर दबाव आणला आणि अवघ्या 141 षटकांत 672 धावा फटकावल्या.