Ashes 2019: दुसऱ्या टेस्टमध्ये वेळेआधीच झाला लंच ब्रेक, लॉर्ड्समधील जेवणाचा मेनू उघडकीस
(Photo Credit: @HomeOfCricket/Twitter)

इंग्लंड(England)-ऑस्ट्रेलिया (Australia) मधील दुसऱ्या अ‍ॅशेस (Ashes) टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार होती. पण, आजच्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाने व्यत्यय आणला आहे. हा दुसरा सामना आजपासून लॉर्ड्सवर (Lords) सुरु होणार होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया बाजी मारून आघाडी वाढवणार की इंग्लंड विजय मिळवत ऑस्ट्रेलियाशी 1-1 अशी बरोबरी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आता तर अंपायरांनी वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घेतल्याचे समोर आहे आहे.  (Ashes 2019: जोफ्रा आर्चर-स्टिव्ह स्मिथ आणि अन्य खेळाडूंमधील लढाई आणेल लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत)

दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी लॉर्ड्सवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टॉसदेखील होऊ शकला नाही. पाऊस थांबत नसल्याने सामना सुरु होऊ शकत नाही. पण काही वेळाने सामना सुरु करायचा झाला तर त्यामध्ये अन्य कसलाही व्यत्यय येता कामा नये, अशी भूमिका पंचांनी घेतली. त्यामुळे पावसामुळे खेळ थांबलेला असतानाच वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घोषित करण्यात आला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत ट्विटर हँडलने दुपारच्या जेवणाच्या ब्रेकदरम्यान खेळाडूंना देण्यात आलेलय संपूर्ण मेनूचा फोटो शेअर केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि नॅथन लायन (Nathan Lyon) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिला टेस्ट सामना जिंकला. स्मिथने दोन्ही डावांत शतकी खेळी केली तर दुसऱ्या डावांत लायनने 6 गडी बाद करत संघाला विजयाच्या जवळ नेले. ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला होता.