Ashes 2019: जोफ्रा आर्चर-स्टिव्ह स्मिथ आणि अन्य खेळाडूंमधील लढाई आणेल लॉर्ड्स टेस्टमध्ये रंगत
(Photo Credit: @cricketcomau/Twitter)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील अ‍ॅशेस (Ashes) लढत पिढ्यान्पिढ्या क्रिकेट प्रेमींसाठी, निर्विवादपाने क्रिकेटमधील सर्वात जबरदस्त स्पर्धा राहिली आहे. आज देखील अन्य स्पर्धेव्यतिरिक्त अ‍ॅशेस क्रिकेट चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील अ‍ॅशेसची लढत अगदी प्रतिष्ठेची मानली जाते. एजबॅस्टन येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये कांगारूंचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने दोन्ही डावांमध्ये वर्चस्व राखत संघाच्या विजयात मोलाचा वाट निभावला. ऑस्ट्रेलियाचा रन-मशीन स्मिथच्या सलग दोन शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एजबॅस्टनच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विश्वविजेते इंग्लंडला धूळ चारली आणि 5-सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. (Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टसाठी माइकल वॉन याने निवडले आपले Playing XI, सुचवले हे तीन बदल)

आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील. दुसरी अ‍ॅशेस टेस्ट लॉर्ड्सच्या मैदानावर 14 ऑगस्ट पासून खेळली जाईल. यासाठी इंग्लंडने आपला 12-सदस्यांचा संघ देखील जाहीर केला आहे. यात जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि जॅक लीच (Jack Leach) यांचा समावेश केला आहे. अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन करण्याची इंग्लंडकडे संधी आहे. पण हे त्यांच्यासाठी सोप्पे नसणार. दुसऱ्या टेस्टमध्ये या तीन खेळाडूंमधील लढत संघासाठी महत्त्वाची असणार आहे.

जोफ्रा आर्चर vs स्टिव्ह स्मिथ

जोफ्रा आर्चर आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: @cricketcomau/Twitter)

इंग्लंड विश्वचषकाचा नायक आर्चर दुसऱ्या टेस्टमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. 24 वर्षीय आर्चर दुखापतग्रस्त जेम्स अँडरसन याच्या बदली खेळण्याची शक्यता आहे. आर्चर ऑस्ट्रेलियाई फलंदाजांवर भारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ससेक्स सेकंड XI संघाचे प्रतिनिधित्व करताना आर्चरने 27 धावांत 6 विकेट्स घेत ग्लोसेस्टरशायर संघाचा डाव 79 धावांत गुंडाळला. आर्चर आणि स्मिथ यांच्यातील तीव्र लढाई चाहत्यांसाठी आकर्षण असेल हे नक्की. स्मिथने पहिल्या टेस्ट एकाकी झुंज देत इंग्लंडकडून सामना हिरकवून घेतला होता. जो रूट आणि संघाने पहिली टेस्ट फक्त स्मिथच्या जबरदस्त खेळीमुले गमावली. या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ स्मिथकडून तशाच खेळीची अपेक्षा करत असेल.

डेविड वॉर्नर vs स्टुअर्ट ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉड आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: @englandcricket/Instagram and @cricketcomau/Twitter)

ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, डेविड वॉर्नर (David Warner) पहिल्या टेस्टमध्ये काही खास खेळी करू शकला नाही. जखमी जेम्स अँडरसनच्या अनुपस्थितीत गोलंदाजीचे नेतृत्व करणार्‍या अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad)विरुद्ध वॉर्नर संघर्ष करताना दिसला. ब्रॉडने पहिल्या टेस्टच्या दोन्ही डावांमध्ये वॉर्नरला गाशा गुंडाळायला लावला. वॉर्नरने सावधगिरीने त्याचे स्ट्रोक खेळात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भरपूर यश संपादन केले आहेत. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत फिरत्या बॉलविरुद्ध त्याची खरी परीक्षा आहे. आणि दुसऱ्या टेस्टमध्ये चांगले प्रदर्शन करण्याचे वॉर्नरसमोर कठीण आव्हान असेल.

जेसन रॉय vs नॅथन लायन

जेसन रॉय आणि नॅथन लायन (@cricketcomau/@jasonroy20/Twitter)

जेसन रॉय (Jason Roy) याने पहिल्या टेस्टमध्ये सर्वांना निराश केले. पहिल्या डावात रॉय जेम्स पॅटिनसन याचा शिकार बनला. विश्वचषकमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या रॉयकडून सर्वांना अपेक्षा होत्या. विश्वचषकमधील खेळीच्या जोरावर त्याने इंग्लंडच्या टेस्ट संघात स्थान मिळवले होते. आणि आता ते टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्याच्या समोर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन (Nathan Lyon)याने दुसऱ्या डावात आपली चमक दाखवली आणि दोन्ही डावांमध्ये मिळून 9 विकेट्स मिळवत एजबॅस्टनच्या मैदानावर संघाला 18 वर्षात पहिला विजय मिळवून दिला.

मर्यादित ओव्हरच्या खेळामुळे टेस्ट संघात मिळाले स्थान टिकवून ठेवण्यासाठी रॉय उत्सुक असेल. सुरवातीला काउंटर-अ‍ॅटॅकिंगवर जोर देण्याच्या वक्तृत्ववादाची पर्वा न करता, रॉय आपला नैसर्गिक खेळ करत संघाला एक चांगली सुरुवात मिळवून देण्याच्या उद्देशाने लॉर्ड्सच्या मैदानात उतरेल. टेस्ट सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी आवश्यक असलेल्या गुणधर्मांचा विचार केला तर फिरकी गोलंदाजीचा सामना करणे ही एक महत्वाचे आहे. आणि रॉयला तेच जमवून घ्यायला हवे आहे.

दरम्यान, दुसऱ्या अ‍ॅशेस टेस्टमध्ये विजय मिळवत इंग्लंड 1-1 ची बरोबरी साधण्याच्या निर्धारात असेल. मागील सामन्यात स्टिव्ह स्मिथने सावध पण आक्रमक फलंदाजी करत सामन्यात रंगत आणली होती. इंग्लंडसाठी दुसऱ्या सामन्यात स्मिथ पुन्हा धोका सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे आर्चरने त्याला मिळालेल्या संधीचे सोनं करत स्वतःची निवड सिद्ध करावी लागेल.