Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टसाठी माइकल वॉन याने निवडले आपले Playing XI, सुचवले हे तीन बदल
इंग्लंड संघ (Photo Credit:AP/PTI)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील अ‍ॅशेस (Ashes) टेस्ट मालिकेतील दुसरा सामना 14 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या (Lords) प्रतिष्ठित मैदानात खेळाला जाणार आहे. यासाठी इंग्लंडने आपला 12 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. यात इंग्लंड बोर्डने काही बदल केले आहेत. दुखापतग्रस्त जेम्स अँडरसन (James Anderson) याच्या अनुपस्थितीत विश्वचषकमध्ये इंग्लंडचा हिरो राहिलेला जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याला दुसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. तर मोईन अली (Moeen Ali) याला डच्चू दिला. पहिल्या टेस्ट सामन्यात अलीला साजेशी कामगिरी करता आली नाही. (Ashes 2019: लॉर्ड्स टेस्टसाठी इंग्लंडचा 12-सदस्यीय संघ जाहीर; मोईन अली याला वगळले, जोफ्रा आर्चर आणि जॅक लीच यांना संघात स्थान)

पहिल्या अ‍ॅशेस टेस्ट जिंकत ऑस्ट्रेलियाने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला बरोबरी साधण्याची चांगली संधी आहे. पण, या दुसऱ्या टेस्ट सामन्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन (Michael Vaughan) याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यासाठी इंग्लंडसाठी प्लेइंग इलेव्हन सुचवला आहे. वॉनने त्यांच्या प्लेयिंग इलेव्हनद्वारे संघात अनेक बदल नमूद केले आहेत. अलीच्या जागी जॅक लीच याला संधी मिळेल तर जखमी अँडरसनच्या जागी आर्चर इंग्लंडसाठी टेस्टमध्ये पदार्पण करेल. इंग्लंडने जो डेन्ली (Joe Denly) याच्या जागी युवा अष्टपैलू सॅम कुर्रान (Sam Curran) याचा समावेश करावा आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) याने यजमानांकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, अश्या सूचना वॉनने दिल्या आहेत.

असा आहे वॉनचा प्लेइंग इलेव्हनः रोरी बर्न्स, जेसन रॉय, जो रूट(कॅप्टन), बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेयर्स्टो, सॅम कुर्रान, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.