इंग्लंड (England) आणि वेल्स (Wales) क्रिकेट बोर्डाने दुसऱ्या अॅशेस (Ashes) टेस्टसाठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील 5 मालिकेच्या दुसऱ्या अॅशेस टेस्टची सुरुवात 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. पहिली अॅशेस टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलियाने 1-0 आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडला पुनरागमन करण्याची संधी आहे. मागील टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने विजयी खेळी केली होती. त्यामुळे यंदाच्या टेस्टमध्ये देखील त्याच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा आहे. दरम्यान, दुसऱ्या टेस्टसाठी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि जॅक लीच (Jack Leach) यांचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर मोईन अली (Moeen Ali) याला वगळण्यात आले आहे.
जेम्स अँडरसन (James Anderson) आणि ऑली स्टोन यांनी आपापल्या दुखापतीमुळे या सामन्यातून आधीच माघार घेतली होती. पहिल्या टेस्टमध्ये मोईन अलीने 3/172 ची निराशाजनक खेळी केली होती. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्याचवेळी कसोटी सामन्यात नऊ विकेट घेत नॅथन लायन (Nathan Lyon) याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा दिला. आर्चरदेखील त्याच्या दुखापतीतून सावरला आहे. त्याने ससेक्स द्वितीय इलेव्हनकडून खेळत त्याने आपले फिटनेस सिद्ध केले. त्याने सहा गडी बाद केले आणि त्यानंतर शतकही ठोकले. दुसरीकडे, जॅक लीच आयर्लंडविरुद्ध वन-ऑफ टेस्टमध्ये त्याने महत्वपूर्ण योगदान दिले होते. यासाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यामुळे पहिल्या टेस्टमधून त्याला बाहेर ठेवण्यात आल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
असा आहे लॉर्ड्स टेस्टसाठी इंग्लंडचा 12-सदस्यीय संघ:
जो रूट (कॅप्टन), जेसन रॉय, रॉरी बर्न्स, जो डेन्ली, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, सॅम कुर्रान, ख्रिस वोक्स, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर.