Rinku Singh (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 15 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता (Eden Gardens, Kolkata) येथे खेळवला जात आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अजिंक्य राहणे करत आहे. तर, हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. कोलकाताने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने हैदराबादसमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

वेंकटेश अय्यरची 60 धावांची शानदार खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने 20 षटकात 6 गडी गमावून 200 धावा केल्या. कोलकाताकडून  वेंकटेश अय्यरने 60 धावांची शानदार खेळी केली. त्याने 29 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय अंगकृष रघुवंशीने 50 आणि रिंकू सिंगने 32 धावांचे योगदान दिले.

दुसरीकडे, कर्णधार पॅट कमिन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, कामेंदु मेंडिस आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.