कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 चा 16 वा सामना केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बार्बाडोस रॉयल्सने गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा 32 धावांनी पराभव केला. यासह बार्बाडोस रॉयल्सने 5 सामन्यांमध्ये चौथा विजय नोंदवला. बार्बाडोस रॉयल्सकडून क्विंटन डी कॉकने शतक झळकावले. क्विंटन डी कॉकने 68 चेंडूत 115 धावा केल्या. ज्यामध्ये 8 चौकार आणि 9 षटकार मारले होते. क्विंटन डी कॉकने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पहिले शतक झळकावले आहे. ( SKN Patriots vs St Lucia Kings CPL 2024 Scorecard: सेंट लुसिया किंग्जने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सचा 5 विकेट्सने केला पराभव, SNP विरुद्ध SLK सामन्याचे पहा स्कोअरकार्ड)
याशिवाय बार्बाडोस रॉयल्सकडून केशव महाराजने 4 षटकात 42 धावा देत 3 बळी घेतले. दुसरीकडे, गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा हा मोसमातील पहिला पराभव होता. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचे चार सामन्यांत तीन विजय आणि एक पराभवासह 6 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचवेळी बार्बाडोस रॉयल्स संघाचे पाच सामन्यांत चार विजय आणि एक पराभवासह 8 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
पाहा हाईलाईट्स
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोस रॉयल्सने 6 गडी गमावून 206 धावा केल्या. बार्बाडोसकडून क्विंटन डी कॉकने शतक झळकावले. क्विंटन डी कॉकने 68 चेंडूत 115 धावा केल्या. याशिवाय कदीम ॲलेने 10 चेंडूत 22 धावा, जेसन होल्डरने 10 चेंडूत 28 धावा आणि ॲलिक अथानाझेने 19 चेंडूत 16 धावा केल्या. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सच्या वतीने रॅमन रेफरने 4 षटकात 50 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय ड्वेन प्रिटोरियसला दोन आणि कीमो पॉलला एक विकेट मिळाली.
207 धावांना प्रत्युत्तर देताना गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघ 20 षटकात 5 गडी गमावून केवळ 173 धावा करू शकला. गयाना ॲमेझॉन वॉरियर्ससाठी शाई होपने 34 चेंडूत सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय शिमरॉन हेटमायरने 10 चेंडूत 28 धावा, मोईन अलीने 19 चेंडूत 33 धावा आणि कीमो पॉलने 18 चेंडूत 30 धावा केल्या. तर बार्बाडोस रॉयल्सकडून केशव महाराजने 4 षटकात 42 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय जेसन होल्डरने दोन विकेट घेतल्या.