Punjab Kings (Photo Credit - X)

Punjab Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 31 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (PBKS vs KKR) यांच्यात महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळवला गेला. या रोमहर्षक सामन्यात, पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 16 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करत कोलकातासमोर 112 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताचा संघ 15.1 षटकात 95 धावांवर गारद झाला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 15.3 षटकांत दहा गडी गमावून 111 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने 15 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, प्रियांश आर्यने 22 धावांचे योगदान दिले. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर वरुन चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

युजवेंद्र चहलने केला 'चमत्कर'

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 15.1 षटकांत 10 विकेट गमावून 95 धावांवर गारद झाला. कोलकाता नाईट रायडर्सकडून अंगकृष रघुवंशीने 37 धावांची खेळी केली. खेळीदरम्यान, त्याने 28 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्याशिवाय कोणीच धावांचे योगदान दिले नाही. त्याच वेळी, युजवेंद्र चहलने 4 तर मार्को जॅनसेन 3 विकेट घेतल्या.