MS Dhoni PUBG Memes: भारतात PUBG गेमवर बंदी येताच नेटकऱ्यांना एमएस धोनीची चिंता, शेअर केले मजेशीर मीम्स! (See Tweets)
एमएस धोनीचे मजेशीर PUBG मीम्स (Photo Credit: Twitter)

भारत (India) सरकारने 2 सप्टेंबर रोजी भारतात PUBG मोबाइल गेमवर बंदी घातली. सध्या चीनसोबत (China) सुरू असलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा भारत सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रसिद्ध खेळाच्या निलंबनाबद्दल सोशल मीडियावर यूजर्सने मिम्स शेअर करण्यास सुरूवात केली. काही क्रिकेटप्रेमींनी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) रॉयल गेमवरील प्रेमावरही प्रकाश टाकला ज्याचा आता तो आनंद घेऊ शकणार नाही. धोनीचे PUBGवरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. धोनीला बर्‍याचदा भारतीय राष्ट्रीय संघातील सदस्यांसह स्मार्टफोनवर गेम खेळताना पाहिले गेले. विमानतळावरील प्रतिक्षा कालावधी असो किंवा आंतरराष्ट्रीय दौऱ्याच्या वेळी हॉटेलच्या खोल्यांमध्ये आराम करताना असो, धोनीला अन्य खेळाडूंसोबत एकत्र PUBG खेळताना पहिले गेले आहे. (सरकारकडून पबजी गेमवर बंदी घातल्याने Twitterati वर पालकांनी व्यक्त केला आनंद तर युजर्सच्या चेहऱ्यावरील नाराजी दाखवणारे मजेशीर मेम्स व्हायरल)

धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Dhoni) लॉकडाऊन दरम्यान धोनी PUBGविषयी 'झोपेबद्दल' कसे बोलत असतो हे उघड केले होते. साक्षीच्या टिप्पण्यांमधून मल्टीप्लेअर गेमचा 39 वर्षीय धोनी किती मोठा चाहता आहेदिसून येते. काही उत्कट MSDiansनी ट्विटरवर काही मिम्स शेअर करत धोनीच्या संपूर्ण विकासावर प्रतिक्रिया दर्शविली.

PUBG वर बंदी

धोनी PUBG मधून निवृत्त होण्यापूर्वी PUBG निवृत्त

धोनीला सर्वकाही माहित होते

धोनीच्या निवृत्तीनंतर 

PUBG वर बंदी

PUBGवर बंदीनंतर धोनीची प्रतिक्रिया

भारतात जवळजवळ 50 लाख सक्रिय PUBG खेळाडू आहेत आणि जगातील पहिल्या पाच स्मार्टफोन गेमिंग अ‍ॅप्समध्ये गेमचा समावेश आहे. धोनीप्रमाणेच युजवेंद्र चहल, केएल राहुल आणि इतर काही क्रिकेटपटू PUBG मोबाइल गेमचे चाहते आहेत. दुसरीकडे, चिनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घालण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सरकारने सुरक्षिततेची चिंता व्यक्त करीत देशात टिकटॉकसह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.