पृथ्वी शॉ (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे याक्षणी कोणतीही स्पर्धा होत नसल्याने भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) महाराष्ट्रातील (Maharashtra) ग्रामस्थांना मदत करण्यात व्यस्त आहे. मांडवा जवळील ढोकावडे गावातल्या (Dhokawade Village) लोकांच्या मदतीसाठी भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी पुढे आला आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना महामारी आणि निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) राज्याला सध्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आणि या सर्वांच्या दरम्यान पृथ्वीने गरजूंना मदत करण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईपासून अंदाजे 110 कि.मी. अंतरावर मांडवा, अलिबाग जवळील ढोकावडे गावात राहणाऱ्या लोकांचे दुःख पाहून पृथ्वी हादरला. लॉकडाऊनमुळे पृथ्वी सध्या धोकावडेमध्ये अडकला असून राजकारणी संजय पोतनिस यांच्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. मिड-डे मधील एका वृत्तानुसार, 20 वर्षीय फलंदाज वृद्ध ग्रामस्थांना घरे पुन्हा बांधायला मदत केली आहे आणि गरजू ग्रामस्थांना आर्थिक सहाय्य देखील केले.

"हो, लॉकडाऊन झाल्यापासून ते [शॉ आणि यश] अलिबागमध्ये आहेत. चक्रीवादळ तिथे खूपच वाईट होतं. संपूर्णधोकावडेगाव बाधित झाले आहे. घरांचे छप्पर नष्ट झाले. माझ्या बंगल्यालाही काही नुकसान झाले आहे. पृथ्वी आणि माझ्या मुलाने गावकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आणि त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांच्या घराच्या छप्पर परत लावण्यास पृथ्वीने मदतच केली नाही तर काही गरजू ग्रामस्थांना आर्थिक मदतही केली,” पोतनीस यांनी मिड-डेला सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रात आजवर कोविड-19 चे 1,10,000 रुग्ण आढळले आहेत. 57,800 पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत तर जवळपास 5,500 लोकांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, या महिन्याच्या सुरूवातीस राज्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादने लोकं आणि राज्य सरकारच्या संकटात आणखी भर घातली. बुधवारी सरकारने चक्रीवादळाने बाधित झालेल्यांसाठी अधिक नुकसान भरपाईची घोषणा केली.