भारतात पुन्हा एकदा आलेल्या कोरोना (Coronavirus) लाटेचा आयपीएलला (IPL 2021) बसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. राजस्थान रॉयलचा गोलंदाज ऍंड्र्यू टॉय ऑस्ट्रेलियात परतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचडर्सन या दोघांनीही आपल्या मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले. यातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) चिंता व्यक्त केली आहे. तसेच भारतातील कोरोना परिस्थितीवर खेळाडू सतत चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या युट्यूब पेजवर रिकी पॉन्टिंग म्हणाली की, आयपीएलबाहेरील जंग भयंकर आहे. यावर्षीची आयपीएल स्पर्धात अतिशय वेगळ्या वातावरणात खेळवली जात आहे. मैदानापेक्षा जास्त, देशाबाहेर आणि देशात काय चालले आहे? याकडे सर्वांचे लक्ष आहे. आम्ही सर्वजण सध्या बायो बबलमध्ये राहतो. त्यामुळे आम्ही कदाचित देशातील सर्वात सुरक्षित लोकांपैकी आहोत. परंतु, खेळाडू सातत्याने बाहेरील परिस्थितीविषयी बोलत असतात, असेही रिकी पॉन्टिंग म्हणाला आहे. हे देखील वाचा- DC Vs RCB, 22nd Match: दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आज लढत; कोणता संघ आहे वरचढ? येथे पाहा संपूर्ण आकडेवारी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परदेशातील खेळाडूंमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर बीसीसीआयने परदेशातील खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे. आयपीएल 2021 साठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने देखील मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी खुद्द खेळाडूंवर सोपवली आहे. त्यानंतर खेळाडूंना सुखरुप मायदेशी पोहचवण्याची जबाबदारी बीसीसीआयने आपल्या खांद्यावर घेतली आहे.