PIL Against Virat Kohli: विराट कोहलीला अटक करा! मद्रास उच्च न्यायालयात टीम इंडियाच्या कर्णधाराविरुद्ध याचिका दाखल, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

एका विचित्र घटनेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री तमन्नाह भाटिया (TTamannaah Bhatia) यांना ऑनलाईन जुगाराला प्रोत्साहन देण्यासाठी अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) दाखल करण्यात आली आहे. चेन्नई येथील एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेत मद्रास उच्च न्यायालयाकडे ऑनलाईन जुगार (Online Gambling) अ‍ॅप्स तरुणांना व्यसनाधीन होत आहे असे सांगून त्यावर बंदी घालण्यासाठी याचिकाकर्त्याने दिशानिर्देशने मागितली आहे. ऑनलाईन जुगार खेळण्याला प्रोत्साहन देण्यासाठी विराटवर आरोप आहे आणि त्याला अटक करण्याची मागणीही याचिकाकर्त्याने केली आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की, ऑनलाइन जुगार कंपन्या तरुणांना ब्रेनवॉश करण्यासाठी विराट आणि तमन्नासारख्या स्टार्सचा वापरत आहेत आणि त्यासाठी दोघांनाही अटक करण्यात यावी, टाइम्स नाऊने शुक्रवारी ही माहिती दिली. (विराट कोहली जाऊन बसला झाडाच्या फांदीवर; भारतीय कर्णधाराच्या बालपणीच्या आठवणीला इरफान पठाणने दिला कोरोना ट्विस्ट, पाहा Tweet)

ऑनलाईन जुगारात गुंतवलेल्या पैशाची परतफेड करता येत नसल्यामुळे आत्महत्या करून मृत्यू झालेल्या एका तरूणाबद्दलही त्यांनी याचिकेत नमूद केले. दरम्यान मंगळवारी, 4 ऑगस्ट रोजी या खटल्याची सुनावणी होईल. आजकाल, ऑनलाइन मॅच खेळले जातात आणि क्रिकेट स्टार्स लोकांकडून त्याची जाहिरात देखील केली जाते. विराट ऑनलाईन गेमलाही प्रोत्साहन देतो. अगदी अलिकडेच मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकार ऑनलाईन रम्मी, इतर ऑनलाइन कार्ड गेम्ससारख्या पैशांचा समावेश असलेल्या खेळांवर बंदी घालणारे कायदे देशभरात आणू शकतातअसे निदर्शनास आणले होते.

सध्या विराटसुद्धा इतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे घरी आहे आणि आयपीएलच्या 13 व्या सत्राची तयारी करत आहेत. आयपीएल 2020 या वर्षी युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि त्याचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला खेळता येईल. मात्र, 10 नोव्हेंबर रोजी फायनल लढत आयोजित होऊ शकते असे म्हटले जात आहे. युएईमध्ये आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ तेथून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया चार सामन्यांची कसोटी मालिका खेळेल आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल.