ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 7 फेब्रुवारी रोजी आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण (Pakistan Jersey)केले. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमच्या भव्य उद्घाटनादरम्यान पीसीबीने खचाखच भरलेल्या गर्दीत त्यांच्या नवीन जर्सीचे आनावरण केले. पीसीबीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, निवेदक जर्सी ही राष्ट्राची ओळख, लोकांची आवड आणि चॅम्पियनची ओळख कशी दर्शवते याबद्दल सांगतो. (Team India New Jersey: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दिसणार नवीन जर्सीत; बीसीसीआयने शेअर केले फोटो (See Photo))
आयसीसी 2025 साठी पाकिस्तानची अधिकृत जर्सी
Presenting Pakistan team's official jersey for the ICC Champions Trophy 2025 🇵🇰🌟
Order now at https://t.co/TWU32Ta9wL 🛒#ChampionsTrophy | #WeHaveWeWill pic.twitter.com/iXZH4TVKqf
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 7, 2025
लाहोरमधील नव्याने नूतनीकरण केलेल्या गद्दाफी स्टेडियमच्या उद्घाटन समारंभात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ विशेष पाहुणे होते. जर्सीच्या अनावरणादरम्यान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि इतर खेळाडूंनी प्रेक्षकांशी संवाद साधला. पाकिस्तानची जर्सी त्यांच्यासाठी काय प्रतिनिधित्व करते हे स्पष्ट केले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा गतविजेता पाकिस्तान 19 फेब्रुवारी रोजी स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळेल तर 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये त्यांचा सामना भारताशी होईल.