PBKS Vs KKR, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा कर्णधार इयॉन मार्गनने टॉस जिंकला; पंजाब किंग्ज विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 21व्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ आज कोलकाता नाईट राईडर्सशी ( Panjab Kings Vs Kolkata Knight Riders) भिडणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी मैदानात ((Narendra Modi Stadium) हा सामना आज (20 एप्रिल) सायंकाळी 7.30 वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात इयॉन मार्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे पंजाबने मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे कोलकाताच्या संघाला चेन्नईविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखीला वाचा- BTS of Rahul Dravid's Viral Video: राहुल द्रविडने सिग्नलवर वाहनांची केली तोडफोड? 'द वॉल'ची जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

ट्वीट-

संघ-

पंजाब किंग्ज: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, मोईसेस हेनरिक्स, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग

कोलकाता नाइट रायडर्स: नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सुनील नरेन, इयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसाद कृष्ण, वरुण चक्रवर्ती