पाकिस्तानचा स्टार खेळाडू Shahid Afridi लवकरच होणार सासरा; मुलगी Aqsa आणि क्रिकेटर Shaheen Shah Afridi यांचे ठरले लग्न 
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) लवकरच सासरा होणार आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा (Aqsa) आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) हे लग्न करणार आहेत. वृत्तानुसार या लग्नासाठी दोन्ही कुटुंबे सज्ज झाली आहेत आणि लवकरच शाहिन आणि अक्साचा साखरपुडा होणार आहे. शाहीनचे वडील अयाज खान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाहीद आफ्रिदीच्या कुटूंबाच्या वतीने असे सांगितले गेले आहे की, शाहीन सध्या क्रिकेट खेळत आहे आणि अक्साही अजून शिकत आहे, त्यामुळे अद्याप यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली जाणार नाही.

शाहिनचे वडील अयाज खान यांनी पाकिस्तानी माध्यमांना सांगितले की लवकरच त्यांच्या मुलाचा साखरपुडा अक़्सा आफ्रिदीबरोबर होईल. अक्साचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांचे लग्न होणार आहे. शाहीन आणि अक्सा या दोघांचेही वय सध्या 20 वर्षे. याआधी दोघांचाही साखरपुडा झाला असल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र कुटुंबाकडून स्पष्ट करण्यात आले शिक्षण पूर्ण झाल्यावरच साखरपुडा होईल.

(हेही वाचा: IPL 2021 Schedule: आयपीएल रणसंग्राम एप्रिलपासून रंगणार, BCCI कडून सामन्यांच्या तारखा जाहीर)

शाहिन आफ्रिदी 2018 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. अगदी कमी कालावधीमध्ये त्याने पाकिस्तान संघात मोठे स्थान प्राप्त केले आहे. 2000 मध्ये जन्मलेला शाहीन फक्त टी -20 क्रिकेटच नव्हे तर आता तो देशासाठी तिन्ही स्वरूपात क्रिकेट खेळत आहे. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 15 कसोटी, 22 एकदिवसीय आणि 21 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शाहीन आफ्रिदीने कसोटीत 48, एकदिवसीय सामन्यात 45 आणि टी -20 मध्ये 24 बळी घेतले आहेत.