मोहम्मद आमिर (Photo Credit: ICC/Twitter)

पाकिस्तान (Pakistan) संघाचा जलद गोलंदाज मोहम्मद अमीर (Mohammd Amir) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आमिरने जुलै 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॅले येथील सामन्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 36 टेस्ट सामन्यात 30.47 च्या सरासरीने 119 विकेट घेतल्या आहेत. त्याने 4 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.  त्याने जमैकामध्ये वेस्टइंडीजविरूद्ध 44 धावांत 6 बळी घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांनी जारी केलेल्या निवेदनात अमीर म्हणाला की, "टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे ही भाग्याची गोष्ट आहे. पण मी आता निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे, असे असले तरी स्थानिक क्रिकेटमध्ये मी खेळत राहणार आहे." (टी-20 विश्वचषक विजेता गोलंदाजाने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, याच्या चेंडूवर MS Dhoni ने ठोकला होता विजयाचा षटकार)

"पाकिस्तानसाठी खेळणे ही माझी इच्छा आणि उद्दीष्ट आहे आणि पुढच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषकासह, आगामी आव्हानांमध्ये शारीरिकरित्या सर्वोत्तम योगदान देण्याचा मी माझा सर्वोत्तम प्रयत्न कारेन."

"माझ्यासाठी हा निर्णय घेणे सोप्पे नव्हते. पण मी काही काळापासून याबाबद विचार करत होतो. पण लवकरच आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिप सुरु होत आहे आणि पाकिस्तान बोर्डने नवीन जलद गोलंदाजांची शोध केली आहे, त्यामुळे मी वेळेवर निवृती घेऊ इच्छितो जेणेकरुन निवड समितीला त्यांच्यानुसार योजना करण्यास शक्य होईल"

पाकिस्तानचा हा बॉलर क्रिकेटविश्वातील गोलंदाजांपैकी एक मानला जातो. टेस्टमधून सन्यास घेतल्यानंतर आमिर वनडे क्रिकेट खेळात राहणार आहे. आमिरने वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता, परंतु 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यातील गुंतवणुकीमुळे त्याला पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्याला खेळातून बाहेर राहावे लागले. त्यानंतर 2016 मध्ये त्याने पुन्हा कसोटीमधून पुनरागमन केलं होतं पण टेस्ट क्रिकेटमध्ये छाप सोडण्यात यश आलं नाही. यंदाच्या विश्वचषकमध्ये पाकिस्तानने निराशाजनक कामगिरी केली. 2015मध्ये सेमीफायनल गाठणाऱ्या पाकिस्तानला यंदा लीग स्टेजमध्ये बाहेर पडावे लागले.